Home Social इंद्रायणीत अजितदादांच्या अस्थींचे हरिनामाच्या गजरात विसर्जन…

इंद्रायणीत अजितदादांच्या अस्थींचे हरिनामाच्या गजरात विसर्जन…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन पवित्र इंद्रायणी नदीत अत्यंत भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. आळंदीकरांनी अश्रूंनी निरोप देत दादांना श्रद्धांजली वाहिली. वडगाव चौकात अस्थिकलश रथ हरिनाम, टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी साधकांसह शहरात दाखल झाला.

         प्रदक्षिणा रस्ता मार्गे भैरवनाथ चौक, चावडी चौकातून अस्थिकलश माऊलींच्या मंदिरासमोर महाद्वार चौकात दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक, ग्रामस्थ व नागरिकांनी अस्थींचे दर्शन घेतले. इंद्रायणी घाटावर अस्थिकलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर इंद्रायणीच्या पवित्र डोहात अस्थिविसर्जन करण्यात आले. संपूर्ण विधी दरम्यान वातावरण शोकाकुल होते.

          यावेळी माजी आमदार विलास लांडे, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम पाटील, माजी सभापती डी.डी.भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, भाजप राज्य परिषद सदस्य राम गावडे, भाजप गटनेते सचिन गिलबिले, नगरसेवक दिनेश घुले, सागर कुऱ्हाडे, सुरेश झोंबाडे, काँग्रेस शहराध्यक्ष संदीप नाईकरे पाटील, कालिदास तापकीर, बाबासाहेब ठाकूर, चेअरमन अनिकेत कुऱ्हाडे, पुणे भाजपचे सचिव किरण येळवंडे, माजी नगरसेवक पांडुरंग वहिले, भाऊसाहेब कोळेकर, आशिष गोगावले, संदेश तापकीर, सौरभ गव्हाणे, निसार सय्यद, संकेत वाघमारे, राहूल घोलप, पुष्पाताई कुऱ्हाडे, रूपालीताई पानसरे आदी उपस्थित होते.