बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपूर प्रतिनिधी
28 जानेवारी रोजी झालेल्या दु:खद विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले होते.त्यांचा अस्थीकलश विधिवत अंत्यदर्शनासाठी कुटुंबीय,व समर्थक यांच्या वतीने कार्यकर्त्यांसमवेत देण्यात आले होते.
लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीत संगमावर विष्णुपंत कुलकर्णी यांनी अस्थी कलशाची पूजा व विधी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर,इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर,प्रताप पाटील आतुल झगडे,महिला तालुका अध्यक्ष साधना केकान यांच्या हस्ते भीमा नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले केले.
आठव्या दिवशी अस्थी कलश इंदापूर तालुक्यात लक्ष्मी नरसिंह तीर्थक्षेत्र येथील संगमावर पूजा व विधी केल्यानंतर उपस्थित आलेल्या सर्वच कार्यकर्ते,पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शेवटचे अंत्यदर्शन घेतले.
बारामती पासून ते नरसिहपूर पर्यंत प्रत्येक गावोगावी सर्व कार्यकर्ते,ग्रामस्थ यांनी अस्थी कलशाचे अंत्य दर्शन हजारो कार्यकर्त्यांनी घेतले.यावेळी वातावरण अत्यंत भावनिक आणि शोकाकुल होत होते.
पवार परिवाराच्या निर्णया नुसार सर्व विधी पूर्ण करण्यात आले.लक्ष्मी नरसिंहाच्या पावन भूमीतील निरा व भीमा नद्यांच्या संगमावर अस्थी कलशाचे विसर्जन करण्यात आले.
या विधीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाअध्यक्ष संभाजी होळकर,तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे,जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर,प्रताप पाटील,कार्याध्यक्ष अतुल झगडे,सचिन सपकाळ,संग्राम पाटील,महिला तालुका अध्यक्षा साधना केकान,कार्याध्यक्षा उज्वला परदेशी,राज्यश्री पवार,भाग्यश्री दंडवते,माया सरवदे,सहित सर्व भागातील व गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,आजी-माजी सरपंच व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.



