जगात अनेक धर्म आहेत, त्या त्या धर्माचे धर्मग्रंथ पण आहेत, त्यात धर्म म्हणजे काय आणि धर्मानुसार आचरण कसे करावे ? हे लिहून ठेवण्यात आले आहे, त्यानुसार त्या त्या धर्माचे लोक त्या धर्माच्या विचारानुसार आचरण करीत असतात, रोडी परंपरा पण पाळीत असतात, अनेक धर्म आणि त्यानुसार अनेक विचार आणि अनेक आचरण व्यवहार सुरू झाले, त्यामुळे जगाच्या पाठीवर विविध संस्कृती निर्माण झाल्या. अनेक देव आणि अनेक संस्कृती निर्माण झाल्यामुळे अखिल मानव जातीत भांडणे पेटले, तेरे को पाला गेले, इतके की मनुष्यसंहार सुरू झाला.
यावर उपाय म्हणून ज्योतिबा फुलेंनी देव आणि धर्माबद्दल चा एक नवीन विचार मांडला,”ज्योतिबांनी आपल्या लेखनात निर्मिक किंवा निर्माणकर्ता ‘ ही संकल्पना वापरलेली आहे. परंतु या संकल्पनेचे स्वरूप किंवा अशा निर्मिका चावटिकांना समजण्यास मानव असमर्थ असल्याचेच त्यांनी सत्य धर्म पुस्तकात व्यक्त केले आहे. नामस्मरण पूजापाठ आराधना अनुष्ठान तीर्थ भजन पूजन केल्याने किंवा तपश्चर्याने कुणाला अशा निर्मिकाचे दर्शन घडू शकते हे त्यांनी काल्पनिक समजले आहे, चुकीचे म्हटले आहे.
मुलींच्या मते काही कपटी आणि स्वार्थी लोक देवाच्या नावाने असत्य कार्य करतात, धर्मग्रंथात तशी मांडणी करतात, कारण धर्म संबंधित कल्पित छक्के पंजे उत्पन्न केल्याशिवाय त्यांचे पोट भरत नाही किंवा स्वार्थ साधता येत नाही.
फुले म्हणतात ” आपल्या सर्वांच्या श्रमाप्रमाणे उपभोग घेण्याची सुरुवात केल्याबरोबर, एकंदर सर्व जगातील मानवप्राण्यात कोणत्याही तऱ्हेचे निरर्थक कलह उत्पन्न होणार नाहीत ” आणि हाच त्यांनी नामस्मरणाला दिलेला पर्याय आहे.
‘ विचार ‘ हे देवाचे असोत,संतांचे असोत,महात्म्यांचे असोत की महामानवाचे,क्रांतिकारकांचे असोत,ते परिपूर्ण मानून स्वीकारणे किंवा तसे गृहीत धरून त्या विचारांची मांडणी करणे,त्या विचारांचे विश्लेषण,विवेचन,करणे ,त्या विचारांचा समाचार घेणे चुकीचे आहे.कारण कोणत्याही विचारांची निर्मिती ही त्या त्या काळातील व्यवस्था अवस्था परिस्थिती यातून निर्माण होत असते,म्हणून माणसांनी अनुभवातून निर्माण केलेली जी मूल्य आहेत,ती चिरंतन आणि भूत वर्तमान भविष्य त्रिकालाबाधित स्थिर आहेत अशा मूल्यांना गृहीत धरून आधार मानून आपल्या आणि इतरांच्या विचारावर भाष्य करणे उचित होय,योग्य होय.हे चिरंतन मूल्य म्हणजेच जे की,सकलजन हितकारी, वैद्न्यानिक, समतावादी,मानवतावादी असतील.जसे की,प्रेम,बंधुभाव,न्याय,स्वातंत्र्य,सहयोग,विश्वास अशी मानवकल्यानी जे मूल्य असतील अशी मूल्य समोर ठेऊनच विचारांची पेरणी झाली पाहिजे. त्या त्या काळाच्या दृष्टीने क्रांतिकारक विचार व्यवहारात असणे आणि पुढील काळातही उपयोगी पडतील असे विचारांचे धागे असणे हेच महत्त्वाचे आहे त्याचाच वेध घेतला पाहिजे.
खरे तर सर्व धर्मग्रंथानी व्यक्तीचे विचार स्वातंत्र्य रोखले आहे, विचारांना रोखले आहे, विचार ग्रंथातच बंदिस्त केल्या गेले आहेत. त्या त्या विचारानुसार त्या त्या विविध संस्कृती पण निर्माण केल्या गेले आहेत, आणि इथेच माणसाची प्रगती खुंटली आहे, मानसिक प्रगती थांबली आहे. म्हणूनच आज धर्म ही एक मानसिक बिमारी बनले आहे. ही बिमारी एवढी क्रिटिकल म्हणजे गुंतागुंतीची आहे की, त्यावर उपाय करणारे पण त्रस्त आहेत.
ज्योतिबा फुलेंनी देव ही संकल्पना न मानता निर्मिक ही संकल्पना मानली आहे. निर्मिका कोणी आहे का व्यक्तीचा जातीचा धर्माचा नसून तो सर्वांचाच आहे आणि सर्वांसाठीच आहे अशी त्यांनी संकल्पना मांडलेली आहे. सारेच धर्म पण भगवान ईश्वर देव अल्ला गोड हे अनेक नसून एकच आहे असे मानतात पण व्यवहारात मात्र त्यांना अलग अलग करतात. आमच्या धर्माचा देव आणि तुमच्या धर्माचा देव असे अलग अलग देव मानण्याची प्रथा सुरू झाली, आमच्या धर्माची आणि धर्मग्रंथाची निर्मिती देवानेच केली, असे चक्क खोटे बोलून सामान्य जनतेची दिशाभूल केली, आणि देव आणि धर्म हे मुक्तीचे साधन न बनता ते शोषणाचे साधन बनले, देवाने आणि धर्माने माणसाला बंदिस्त केले, दास बनविले, गुलाम केले. मालक आणि गुलाम अशी व्यवस्था निर्माण केली, आजपर्यंत हे जोपासल्या जात आहे. जोपर्यंत सोशलमुक्त आणि शासन मुक्त समाज व्यवस्था निर्माण होणार नाही, तोपर्यंत ही गुलामीची व्यवस्था बदलणार नाही, हे पण तितकेच सत्य आहे.
ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाज नावाची संघटना आणि चळवळ उभी केली, गावोगावी सत्यशोधक समाज च्या शाखा निर्माण केल्या, आणि या शाखेंना कार्यक्रम पण दिला, त्याचे कारण म्हणजे एक सत्य वर आधारित एक नवीन संस्कृती निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. सत्यशोधन ही एक ‘ जीवनरीत ‘ व्हावी, ते एक सामाजिक व वैयक्तिक आचरण मूल्य बनावे, असे त्यांना वाटत होते. यासाठीच त्यांनी सत्य, निर्मिक, सार्वजनिक सत्यधर्म, यावर आपले विचार मांडले. आणि तशी कृती पण केली.
सत्य वर्तन म्हणजे काय आणि सत्य वर्तन करणारे कुणास म्हणावे ? हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पुढील गोष्टी सांगितल्या.
1) श्री अथवा पुरुष स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला भाऊबंद केला सूर्योदयऱ्यांना आणि ईस्ट मित्रांनो मोठ्या तोऱ्याने पिढी जात श्रेष्ठ मानतात पवित्र म्हणतात आणि इतरांना श्रेष्ठ पवित्र मानत नाहीत तर कनिष्ठ आणि अपवित्र म्हणतात ते असत्य वर्तन करतात असे मानावे. आणि जे स्त्री-पुरुष आपले आणि परके यात भेदभाव करून श्रेष्ठ कनिष्ठ, पवित्र पवित्र, उच्चनीच असा भेदभाव करत नाहीत ते स्त्री-पुरुष सत्य वर्तन करणारे म्हणावेत.
2) स्त्री अथवा पुरुष जे पूर्वेकप्ताने लिहिलेल्या ग्रंथाच्या वहिवाटीवरून काही मानवास पिढी जात दास मानत नाहीत अथवादास मांडणाऱ्यांना माहीत नाहीत त्यास सत्तेवर्तन करणारे म्हणावेत.
3) स्त्री अथवा पुरुष जे शेतकी अथवा कला कौशल्य करून पोट भरणाऱ्यास श्रेष्ठ मानतात आणि शेतकरी वर्गास मदत करणाऱ्यांचा आदर्श आदर्श सत्कार करतात त्यास सत्तेवर्तन करणारे म्हणावेत.
4) स्त्री अथवा पुरुष जे स्वतः काही उद्योग धंदा न करता निरर्थक दांभिक पणाचा ढोल घालून अज्ञानी जनास नवग्रहाची पीडा दाखवून ज्योतिष सांगून त्यास भोंदून खात नाहीत किंवा ततसंबंधी पुस्तके लिहून आपली पोटे भरत नाहीत त्यास सत्तेवर्तन करणारे म्हणावेत.
5) श्री अथवा पुरुष जे आपल्या सर्वांच्या निर्मिकाने निर्माण केलेल्या प्राणीमात्रापैकी मानव स्त्री-पुरुषांमध्ये कोणत्या स्त्रीची आवड निवड भेदभाव न करता त्यांचे खाणे पिणे लेणे याविषयी कोणत्याच प्रकारचा विधी निषेध न करिता त्यांच्याबरोबर शुद्ध अंतकरणाने आचरण करितात त्यास सत्य वर्तन करणारे म्हणावेत.
अशाप्रकारे ज्योतिबा फुलेंनी निर्मिक, सत्य, सत्यधर्म, सदाचरण, सत्य वर्तन, यासंबंधी ‘सार्वजनिक सत्यधर्म ‘ या ग्रंथात लिहून ठेवले आहे.
संदर्भ: ‘ म.फुले आणि सांस्कृतिक संघर्ष ‘ लेखक : भारत पाटणकर.
वाचकांनी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे,कारण यामुळे आपण आपले विचार तपासून घेण्यास मदत होईल.



