Home Social दिवंगत ग्रामपंचायत सदस्य विनोद वाढई यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिकलसेल तपासणी व परीक्षा पॅडचे...

दिवंगत ग्रामपंचायत सदस्य विनोद वाढई यांच्या स्मृतिदिनानिमित्त सिकलसेल तपासणी व परीक्षा पॅडचे वाटप… — ग्रामपंचायत बेंबाळ कार्यालयाकडून प्रथम पुण्यस्मरण निमित्त अभिनव उपक्रम…

 प्रेम गावंडे

 उपसंपादक

दखल न्युज भारत

               ग्रामपंचायत बेंबाळ येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य विनोद हरिदास वाढई यांचे मागील वर्षी आकस्मिक निधन झाले होते. विनोद वाढई यांचा स्वभाव व त्यांचे जनतेप्रती कार्य उत्तम होते.

          त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ग्रामपंचायत बेंबाळ यांच्या उपक्रमातून सिकलसेल तपासणी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

          सदर कार्यक्रमात विनोद वाढई यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपक वाढई, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन नीलमवार, गायत्री विनोद वाढई तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामपंचायत सदस्य राकेश दहीकर यांनी केले.