Home Maharashtra चिमूर तालुकातंर्गत मौजा कोटगाव येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम केव्हा सुरू होणार? ...

चिमूर तालुकातंर्गत मौजा कोटगाव येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम केव्हा सुरू होणार? — संबंधितांच्या असंवेदनशीलपणामुळे तथा हलगर्जीपणामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांची जिवीत हानी होण्याची शक्यता!,”गंभीर प्रकरण,…

  उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

         चंद्रपूर जिल्हा अंतर्गत चिमूर तालुक्यातील मौजा कोटगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम मंजूर असताना सदर शाळेच्या इमारतीचे बांधकाम केव्हा करणार?हा प्रश्न निर्माण झाला आहे.

           मौजा कोटगाव येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम नागभिड तालुक्यातील मौजा कान्पा येथील,”चंद्रभान मजूर सहसंस्था,यांना १५ सप्तेंबर २०२५ ला नियमानुसार देण्यात आले होते.

        करारनाम्यानुसार सहा महिन्यांत शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणे बंधनकारक केले आहे.परंतु चार महिन्याचा कालावधी उलटला तरी शाळेच्या इमारतीचे बांधकाम अजूनपर्यंत चंद्रभान मजूर सहसंस्था यांच्या द्वारा सुरू करण्यात आले नाही.

            मौजा कोटगाव येथील पालक वर्ग,ग्रामपंचायत पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी दिनांक २९/१२/२०२५ ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे शाळा इमारत बांधकाम मंजूर संबंधाने गेले होते.

              मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या भेटी अंतर्गत शाळा इमारत बांधकाम संबंधाने सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी कार्यकारी अभियंता (समग्र) जिल्हा परिषद चंद्रपूर यांची भेट घेण्यास सांगितले.

               मौजा कोटगाव येथील पालक वर्ग,ग्रामपंचायत पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता (समग्र) यांची भेट घेतली असता,मौजा कोटगाव येथील एक वर्गखोली शाळा इमारतीचे बांधकाम मंजूर असल्याचे सांगितले व शाळा इमारत बांधकामाचा कंत्राट मौजा कान्पा येथील,”चंद्रभान मजूर सहसंस्था,यांना देण्यात आला असल्याचे लेखी पत्र शिष्टमंडळाला दिले व दुसऱ्या शाळा इमारतीचे बांधकाम येत्या वार्षीक सत्रात मंजूर केले जाईल असे आश्वासन सुध्दा कार्यकारी अभियंता (समग्र) यांनी दिले.

         चिमूर तालुक्यातील एका व्यक्तींने शाळा इमारत बांधकाम संबंधाने पायवा खोदून ठेवला आहे.पण,त्यांनी सुध्दा शाळा इमारतीचे बांधकाम अजूनही सुरू केले नाही.

          मंजूर असलेल्या मौजा कोटगाव येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम यावर्षी न झाल्यास,पळक्या शाळा इमारती अंतर्गत तेथील शिक्षकांसह विद्यार्थ्यांची जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.

           मौजा कोटगाव येथील शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यास संबंधित चंद्रभान मजूर सहसंस्था द्वारे टाळाटाळ करणे सुरू असताना,कार्यकारी अभियंता (समग्र) जिल्हा परिषद चंद्रपूर व चिमूर पंचायत समिती अंतर्गत शिक्षण विभागाचे उपविभागीय अभियंता,(समग्र) हे असंवेदनशीलपणाचे व हलगर्जीपणाचे कर्तव्य कसे काय पार पाडतात हेच कळायला मार्ग नाही.

          कंत्राटदार चंद्रभान मजूर सहसंस्था प्रमुख,संबंधित दोन्ही अभियंत्या (समग्र) यांच्या असंवेदनशील व हलगर्जीपणाच्या कर्तव्यामुळे शिक्षकांची व विद्यार्थ्यांची जिवितहानी झाल्यास त्यांनाच जबाबदार धरण्यात येईल असे मौजा कोटगाव येथील पालक वर्गाचे व नागरिकांचे म्हणणे आहे..