Home Social वाहनगाव जवळ बोलेरो-दुचाकीचा भीषण अपघात… — दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

वाहनगाव जवळ बोलेरो-दुचाकीचा भीषण अपघात… — दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

       चिमूर -चंद्रपूर मार्गावरील वाहनगाव येथील शिव मंदिराजवळ आज,दुपारी १२ वाजताच्या सुमारास थरारक अपघाताची घटना घडली.

        एका भरधाव बोलेरोने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.हि दुर्दैवी घटना बघताना अनेक नागरिक हळहळ व्यक्त करीत होते.

        मिळालेल्या माहितीनुसार,बोलेरो गाडी (क्रमांक MH 34 BB 1225) ही चंद्रपूरच्या दिशेने जात असताना शिव मंदिराजवळील वळणावर समोरून येणाऱ्या अॅक्टिव्हा दुचाकीला (क्रमांक MH 34 BH 3208) धडकली.ही धडक इतकी भीषण होती की,दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्यावर आदळला.

           डोक्याला गंभीर इजा होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने सदर व्यक्तीचा जागीच प्राण गेला.

       अपघाताचा आवाज ऐकून शिव मंदिरातील भाविक आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

       अपघातानंतर बोलेरोच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला.

         बातमी प्रकाशित करेपर्यंत मृतकाचे संपूर्णनाव व इतर माहिती कळू शकली नाही.