भविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात अरण्यदीप 2026 वार्षिक युवा सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित विविध क्रीडा स्पर्धा दिनांक 22 व 23 जानेवारी 2026 ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय थुल आणि संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग डॉ. संजय मुरकुटे यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अंगी असलेल्या विविध क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी क्रिकेट स्पर्धा व्हॉलीबॉल स्पर्धा कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
क्रिकेट स्पर्धेत बीएससी थर्ड इयर संघ विजेता तर बारावी सायन्स संघ उपविजेता ठरला व्हॉलीबॉल स्पर्धेत बीए तृतीय संघ विजेता तर अकरावी विज्ञान उपविजेता ठरला मुलांच्या कबड्डी स्पर्धेत बीए तृतीय संघ विजेता तर मुलीच्या कबड्डी स्पर्धेत कनिष्ठ बारावी विज्ञान संघ उपविजेता ठरला तर मुलींच्या कबड्डी स्पर्धेत कनिष्ठ विज्ञान ग्रुप संघ विजेता तर अकरावी विज्ञान संघ उपविजेता ठरला.
सर्व स्पर्धे दरम्यान प्रा.डॉ.भुरसे मनोज ननावरे कार्तिक मडावी साहिल विशाल मिडावी अरुण धुर्वे यांनी पंचा ची कामगिरी चोख पणे पार पाडली सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ.किरमिरे, प्रा.डॉ.जंबेवार, डॉ. चुधरी, डॉ.लांजेवार, डॉ.चव्हाण, डॉ.झाडे, प्रा.बनसोड, डॉ. धवनकर,डॉ.पठाडे, प्रा. पुण्यप्रेड्डीवार, प्रा. तोंडरे, प्रा.वाळके, प्रा.गोहणे, प्रा.धाकडे, प्रा.खोब्रागडे, प्रा.करमनकर, प्रा. आवारी, प्रा.रणदिवे, प्रा.मांडवगवडे, मनापुरे, कायते, गोहने, लांबट, वाढणंकर,राजगडे आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.



