दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
पूणे :- ब्राह्मण हा जातीचा निर्माता आहे. जातीची ओळख ही प्रतिक्रांतीनंतर ब्राह्मणांनी दिलेली ओळख आहे, असा हल्लाबोल व्ही. व्ही. जाधव यांनी रविवारी केला. ते पुणे येथे लहूजी क्रांती मोर्चा द्वारे आयोजित मांग, गारूडी पोटजाती जागृती परिषदेत बोलत होते.
पुढे जाधव म्हणाले कि 1950 संविधान लागू झालं, असं समजलं तर 1961 पर्यंत आम्ही होशमध्ये नव्हतो. हळू-हळू 1970 मध्ये शिक्षक म्हणून नोकरीला तुरळक लोक लागले. अल्प पगार असूनही गावांजवळ होती म्हणून त्यांनी ती नौकरी स्वीकारली. 70 ते 80 दशक गेलं. यानंतर आरक्षणाच्या माध्यमातून आमचे लोक काही संस्थेमध्ये डॉक्टर, इंजिनिअर आणि प्राध्यापक म्हणून चमकू लागले. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि समाजात लोक अशिक्षित असतील, हे म्हणणं चुकीचं आहे. एक वर्ग साक्षर आहे, ज्याला लिहिता आणि वाचता येतं. म्हणून आपण सर्टिफाईड झालो आणि शिक्षण संस्थेकडून आपल्याला एक कागद मिळाला. आणि समाजातील जे काही लोकं असतील त्यांच्याकडे दोन हजार वर्षांपासून शिक्षण आहे.
आमच्या संस्कृतीचं आणि विरासतीचं मोठ्या प्रमाणात ब्राह्मणीकरण झाल्यामुळे आम्ही त्याच्यातून बोध घेत नाही आहे. मी तुमच्यामध्ये चुकून आलेला वक्ता बोलतोय. मी घुमंतू वर्गामधून येतोय. या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्या तर जानवते कि काही वेळापूर्वी एक वक्ता म्हणाले कि गारूडी यांच्याकडे उपजीविकेचं साधन नसल्यामुळे त्यांनी जंगलात मुंगूस आणि साप पकडाचं. हा मदारी वर्ग झाला.
मातंगांमध्ये काम करण्याची परंपरा ही जनावरांच शेविंगकरण्यासी संबंधित आहे. यामध्ये वेगवेगळा प्रकार आहे. व्यवसायाच्या निमित्ताने तो भटकंती करायचा. असा दावा त्यांनी केला.
जाधव म्हणाले कि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, बाबासाहेब त्या काळातले सर्वात विद्वान. त्यांच्या लक्षात आलं कि जे आम्ही आहोत ने नाहीत. म्हणजे आम्ही गारूडी समजतोय पण आम्ही गारूडी नाहीत. जे आज आम्ही मातंग समजतो ते आज नाहीत. जातीची ओळख ही प्रतिक्रांतीनंतर ब्राह्मणांनी दिलेली ओळख आहे.
समग्र मातंग समाजामध्ये जे आडनावं आहेत, ती आडनावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लढणार्या मावळ्यांमध्येही आहेत. शिवाजी महाराजांचं आडनाव भोसले आहे. हेच आडनाव भटके, एससी, मातंग, मराठा यांच्यातही आहेत. शिवाजी महाराज तुळजा भवाणीच्या दर्शनासाठी जात होते, आम्ही पण जातो.
समाजामध्ये आम्ही जेव्हा ऐकायचो तेव्हा त्यांना लक्ष्मी पूत्र म्हणायचे. एकीकडे लक्ष्मी पूत्र आणि लक्ष्मीच गायब आहे.
करवीरमध्ये महालक्ष्मीचं मंदीर आहे. देशभरात जी मंदिरं आहेत, ती आमची विरासत आहे. आज महालक्ष्मीला पूजलं जातय, त्याचा संदर्भ लेण्यात आहे. म्हणजे जगात महान लक्ष्मणला जन्म दिलेली आई. म्हणजेच महालक्ष्मी. आज जगात महान लक्ष असणारा महामानव बुद्ध आहे. आज 2500 वर्षे झाले आणि ते 28 वे बुद्ध आहे. प्रतिक्रांतीनंतर आमच्या ज्या परंपरा आहेत, त्याचं डिब्राम्हणायझेशन केलं पाहिजे. असंही ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जागृती करताना ‘अस्पृश्य पूर्वी कोण होते? या नावाचं एक पुस्तक लिहिलं. आता आमच्यातील बुद्धिमान लोकांनी ‘मांग पूर्वी कोण होते’ यावर संशोधन केलं पाहिजे. आम्ही त्यांना सांगितलं कि आम्ही राजपूत्र होतो, काय फरक पडेल.
आज आमच्याकडे राजेशाही नाही आहे. परंतू आम्ही त्यांना सांगितलं कि इतिहासामध्ये आम्ही शाक्य वंशाची जमात आहोत. आज आमची एवढी बदतर स्थिती का झाली, हे माहित नाही तर आम्हाला या स्थितीत कोणी आणलं. हे कसे माहित होणार. ब्राह्मणांनी आम्हाला जातीची ओळख दिली. ब्राह्मण हा जातीचा निर्माता आहे. तो त्यांच्यात जाती निर्माण करतो आणि त्यांनाच आपसामध्ये भिडवतो.
जातीची ओळख ही गुलामी आहे. असंही त्यांनी सांगितलं. जाधव म्हणाले कि ज्यावेळी जोतीराव फुले मूलनिवासी बहुजन समाजाच्या स्वातंत्र्याच आंदोलन चालवत होते त्यावेळी लहुजी साळवे कि जोतीराव फुलेंसोबत काम करत होते. फुलेंच्या आंदोलनाची विचारधारा समजली म्हणून वस्ताद लहुजी साळवे जोतीराव फुलेंसोबत आले. आपण ज्या लोकांना महान समजतोय त्यांनी आपली बहिण जाळली, आई जाळली, चुलती जाळली, म्हणजे त्यांनी काय केलय? जे स्वतःच्या आईला जिवंत जाळतात कारण त्यांना माहित आहे कि तिला जर जिवंत ठेवलं तर सर्व व्यवस्था बिघडते. राष्ट्रपिता जोतीराव फुलेंचं आंदोलन हे आमच्या आझादीचं आंदोलन होतं, म्हणून ते कांग्रेसमध्ये गेले नाहीत.
कांग्रेसचं आंदोलन हे इंग्रजांच्या प्रशासनात हिस्सेदारी मिळावी यासाठी किंवा त्यांना हाकलून आपण राजे व्हावे यासाठी होतं. हे जर आझादीचं आंदोलन आहे तर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे म्हणतात कि ‘ये आझादी झूठी है’ म्हणजे परत पारतंत्र्यांत गेलात. आज शासक आम्ही नाहीत. प्रतिनिधित्वाचा मामला समाप्त झालेला आहे. निजीकरणामुळे नोकर्या समाप्त झाल्या आहेत. जिथे नोकर्या असेत तिथली असस्था भयानक बेकार आहे.
कलेक्टरच्या पेनामध्ये न्याय देण्याची ताकत नाही आहे. मग कोणीही असो. जे लोक मोठ्या पदावर गेलेत त्यांनी देखिल पेनाचा वापर आपल्या समाजाच्या विरोधात केला, असा टोलाही त्यांनी लगावला.
जे लोक शिकले, आरक्षणातून मोठ्या पदावर गेले त्यांना महापुरूष कळाले असे नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यवस्थेला बोलताना म्हणायचे कि ‘या लोकांनी मला दाबण्याची खूप प्रयत्न केला, परंतू मी बीज होतो म्हणून जमीन फाडूण बाहेर आलो. आज येथे जमलेले लोक बिजधारी आहेत. ज्यांना काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे. आज नौकरीचा मामला समाप्त झाला आहे. आरक्षणाचा मामला देखिल संपलेला आहे. असा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले कि आज पार्लमेंटरी ईलेक्शन होत नाही आहेत. लोक विद्रोहात उभे राहू नये म्हणून निवडणूकीत पैशाचा पाऊस पाडला जात आहे. ईव्हिएम मशीन आणि वोटिंगचा गैरवापर चालू आहे. लोकशाही संपलेली आहे. यामुळे विद्रोह निर्माण होऊ नये म्हणून पहिल्यांदा त्यांनी लाडकी बहिण नावाची योजना बनवली. येथे सर्व काही संपलं आहे. देशभरात एकमेकांना आपसांत भिडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना कुणाचीही भीती राहिलेली नाही. त्यांना केवळ अनु. जातीच्याच लोकांची भीती वाटते, असं जाधव म्हणाले.


