Home उपक्रम उमेदच्या ग्रामीण एकल महिलांनी मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनावे :- तहसिलदार उषा चौधरी...

उमेदच्या ग्रामीण एकल महिलांनी मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनावे :- तहसिलदार उषा चौधरी यांचे प्रतिपादन…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी :- ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील महिला कामगार,शेतकरी कष्टकरी, वर्गातील असुन होतकरु आहेत. त्या कोणत्याही अडचणींवर मात करण्याची तयारी ठेवतात.उमेद माध्यमातून महिला जिद्द, चिकाटी,आणि आपल्या अथक परिश्रमातून स्वतः उमेदीच्या ग्रामीण एकल महिलांनी मोठ्या प्रमाणात स्वावलंबी बनावे. असे प्रतिपादन उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान माध्यमाने एकल महिला समावेश मेळावा व विशेष मोहीम तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष प.स.अंतर्गंत तहसिल कार्यालयातील मेळाव्यात तहसिलदार उषा चौधरी बोलत होत्या.

          उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियान माध्यमाने एकल महिला समावेशंन मेळावा विशेष मोहीम तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष प. स. आरमोरी दि. १६ जानेवारी २०२६ रोजी तहसील कार्यालय आरमोरी येथे पार पडला.

               कार्यक्रमाचे अध्यक्ष उषा चौधरी तहसीलदार आरमोरी, मंगेश आरेवार संवर्ग विकास अधिकारी आरमोरी, मडावी बालविकास प्रकल्प अधिकारी, वाकुडकर नायब तहसीलदार, ॲड. नर्गिस पठाण, विनोद बोबाटे तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष आरमोरी, पी एस आखाडे तालुका उपकृषी अधिकारी आरमोरी उपस्थित होते.

          एकल महिलांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यात आले. संचालन पपीता कोल्हे यांनी केले तर आभार प्रणाली भोयर यांनी व्यक्त केले.

         तहसील कार्यालयात स्टॉल लावण्यात आले त्यात उमेदच्या वतीने गांडुळ खत, मिरची पावडर,दशपर्णी अर्क, हळद पावडर, चकली, हिरडा पावडर, चिवडा, मेथी पराते, बालविकास प्रकल्प यांचे साहित्य, आरोग्य विभागाचे प्रबोधिनी स्टॉल, सिकलसेल माहिती स्टॉल लावण्यात आले होते.

        मंगेश बोदेले तालुका व्यवस्थापक, अर्चना मोडक , कविता झलके, हेमंत पित्तुलवार, राजेश शेंडे, दीपाली पवार, संदीप नारनवरे, प्रभाग स्तरीय सर्व मॅनेजर, उपस्थित होते.

         तसेच सि.आय.एफ.फंड,पी.जी., वैयक्तिक व्यावसायिक कर्ज वाटप करण्यात आले.सदरिल कार्यक्रमास तालुक्यातील सर्व एकल महिला व विधवा महिला उपस्थित होत्या.