राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते गडचिरोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नगरसेवक लीलाधर भरडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी पक्ष अधिक सक्रिय राहणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी लिलाधर भरडकर यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले.
या प्रसंगी रवि वसेकर (जिल्हाध्यक्ष), तनुश्रीताई आत्राम (सिनेट सदस्य, गडचिरोली), युनुसभाई शेख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



