उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
श्री.सत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक १३ व १४ जानेवारी २०२६ ला चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपूर येथे दोन दिवसीय गुणगौरव सोहळा व समाज प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व तेली समाज बांधव-भगीनी,युवक-युवती यांना निमंत्रीत करण्यात आनंद होत आहे की,आयोजित श्री.संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव व समाज प्रबोधन आणि गोपालकाला,प्राविण्यप्राप्त गुणवंताचा गुणगौरव सोहळा संपन्न होत आहे.
तरी जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थितीत राहून कार्यक्रम आनंदमय करावा,अशी विनंती कार्यक्रम आयोजकांनी केली आहे.कार्यक्रमाचे स्थळ चिमूर रोड,शंकरपूर असे आहे.
मंगळवार दिनांक १३ जानेवारीचे कार्यक्रम…
मंगळवार,दि. १३/०१/२०२६ ला सकाळी ८ ते १० वा. : ग्रामसफाई करण्यात येणार असून,सकाळी १० ते १२ वा वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सायं. ३ ते ४ वा. : घटस्थापना होणार असून सायं. ५ ते ८.३० वा. शोभायात्रा (मिरवणूक) श्री.संताजी वार्ड नं. ५ येथून निघणार आहे.सदर मिरवणूक मौजा शंकरपूर येथील मुख्य मार्गाने क्रम करणार आहे.
रात्रौ ९ ते १२ वा.संताजी भजन मंडळ शंकरपूर व इतर भजन मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार,दि.१४ जानेवारीचे कार्यक्रम…
सकाळी ५ ते ७ वा. : ग्रामसफाई करण्यात येणार आहे.तर सकाळी ७ ते ९ वा. रांगोळी सजावट व ध्वजारोहण होणार आहे.
सकाळी ९ ते ११ वा संताजी भजन मंडळ शंकरपूर व इतर भजन मंडळ यांचे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी ११ ते २ वा.प्रदिपपाल चौधरी महाराज (सत्यपाल महाराज यांचे शिष्य) यांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दुपारी २ ते ४ वा.मान्यवर पाहुण्यांचे मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. प्राचार्य विठ्ठलराव निखुले सचिव विदर्भ एरंडेल तेली समाज हे असणार आहेत तर उद्घाटक म्हणून श्री.प्रशांतभाऊ कामडे अध्यक्ष विदर्भ एरंडेल तेली समाज हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
सत्कारमुर्ती म्हणून श्री. बंटीभाऊ/किर्तीकुमार भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र हे असणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून श्री.डॉ.नामदेवराव किरसान खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा,श्री.अँड.अभिजित वंजारी आमदार विधान परिषद नागपूर,श्री.सतीशभाऊ वारजुकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंच महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वय चिमूर विधानसभा,श्री.साईशभाऊ वारजूकर सरपंच ग्रा.पं.शंकरपुर,श्री.धनराजभाऊ मुंगले ओ.बी.सी.संघटक महाराष्ट्र प्रदेश,श्री.योगेशभाऊ समरीत संयोजक महाराष्ट् आरक्षण संघर्ष स.चंद्रपूर,सौ.ममताताई डुकरे माजी जि.प.सदस्या चंद्रपुर,सौ.भावनाताई बावनकर माजी पं.स.सदस्या चिमूर,हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री.श्रीधरजी राजमाने तहसिलदार,तहसिल कार्यालय चिमूर,श्री.डी.के.निकुरे नायब तहसिलदार चिमूर,श्री.घनश्यामजी डुकरे जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ तेली समाज महासंग,श्री.रामूजी सहारे सचिव ए.ते.समाज भंडारा,श्री.गजाननराव भजभुजे अध्यक्ष र.ते.समान नागपूर,श्री.देवेंद्रजी कैकाडे सचिव एते.समाज नागपूर,श्री.उमेशभाऊ कोराम अध्यक्ष स्टुडन्टस राईट फाउंडेशन,सौ.सविताताई चौधरी माजी सरपंच सदस्या शंकरपुरश्री.डॉ.परसरामजी नागोसे अध्यक्ष ए.ते.स.चिमूर,श्री.डॉ.चेतन बेलखोडे शंकरपूर,श्री.भाऊरावजी बावनकर अध्यक्ष वि.का.स.सी. संस्था शंकरपूर,श्री.दिपकभाऊ निकुरे अध्यक्ष ए.ते.समाज भद्रावती,श्री.अभिनयभाऊ लाखडे युवा अध्यक्ष ए.ते.समाज नागपूर.समाज नागपूर,श्री. दिनेशभाऊ स. चौधरी युवा उपाध्यक्ष ए.ले. समाज नागपूर,श्री.बाळूजी नागोसे अध्यक्ष ए.ते.समाज भंडारा,श्री.संजयजी सहारे अध्यक्ष ए.ते.समाज ब्रम्हपुरी,श्री.सतिश देव्हारे अध्यक्ष ए.ते.समाज खडरांगी,श्री.ईश्वरभाऊ डुकरे तालुका अध्यक्ष तेली समाज चिमूर,श्री.विनोदभाऊ नागोसे विधीषक,सौ.वंदनाताई सहारे ग्रा.पं.सदस्या शंकरपूर,श्री. प्रेमनाथ ठाकरे सचिव ९.ते. समाज भिवापूर,श्री. वसंताजी चौधरी अध्यक्ष सर्वज्ञ बहुउद्देशिय शिक्षण संस्था शंकरपुर,श्री. संदिपजी मुरारी ठाकरे सदस्य ग्रा.पं.चक जाटेपार हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
दुपारी ४ ते ५ वाजता दरम्यान हळदीकुंकू व तिळगुळ कार्यक्रम आणि गोपालकाला कार्यक्रम होणार आहे.यानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
श्री.संताजी जगनाडे महाराज देवस्थान,शंकरपूर व श्री.संताजी तेली समाज शंकरपूर यांच्या वतीने श्री.संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सव पावन प्रसंगी आयोजित कार्यक्रमास आपली स्नेहपूर्वक उपस्थिती लाभावी अशी विनंती आयोजकांनी जनतेला केली आहे.
आयोजकांनी जाहीर विनंती केली आहे की,श्री.संताजी जगनाडे महाराज देवस्थान,शंकरपूर पदाधिकारी द्वारे मान्यवरांना प्रत्यक्ष निमंत्रण देण्याचा आमचा मनोदय होता.मात्र वेळे अभावी काही ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचता न आल्याने,वाॅटसप द्वारे पाठवलेली निमंत्रण पत्रिका कृपया समजून घ्यावी व आपली बहुमोल उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
आपली उपस्थिती आम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास अशोक ज्ञानेश्वर चौधरी अध्यक्ष श्री.संताजी तेली समाज मंडळ,शंकरपूर तथा समस्त तेली समाज कार्यकारिणी मंडळ श्री.संताजी तेली समाज मंडळ शंकरपूर,श्री संताजी जगनाडे महाराज देवस्थान शंकरपूर यांनी व्यक्त केला आहे..
संस्थेचे पदाधिकारी खालील प्रमाणे…
उपाध्यक्ष श्री.दिनेश तु.शेंडे,सचिव श्री.बंडू सो. भजभूजे/श्री प्रमोद बा.सहारे,कोषाध्यक्ष श्री.नरेंद्र जा.आदमने,सदस्य सर्वश्री श्री.भारत शा.चौधरी,श्री.रामकृष्ण ह. समर्थ,श्री.वामन ग.चौधरी,श्री.प्रमोद मु.निकुरे,श्री.अंकुश मा. करकाडे,श्री.रविंद्र ई. कोलते,सौ. वंदना बा.सहारे,सौ.निता स. तरारे,सौ.रंजना मा.दुरबुडे,सौ.पुष्पा कि राखडे,श्री.रविंद्र म.राखडे (सहसचिव),श्री.मधुकर द. राखडे (मार्गदर्शक), श्री.रविंद्र ग. भजनकर,श्री.अविनाश बा. सहारे,श्री.गुरुदास शा.भजनकर,श्री.सचिन सो. निकुरे,श्री.शरद झि. निकुरे,श्री. कैलास पां. सहारे,श्री.दिनेश चं. दुरबुडे,श्री.अरविंद आ. राखडे,श्री.संदिप मु. ठाकरे,श्री.आशिष वि.नागोसे हे आहेत.
विशेष सहकार्य…
संताजी ग्रामीण सह.पतसंस्था शंकरपूर,संताजी तेली समाज शंकरपूर,संताजी भोजन मंडळ शंकरपूर,संताजी महिला बचत गट शंकरपूर,संताजी पुरुष बचत गट शंकरपूर,संताजी भजन मंडळ शंकरपूर,श्री.संत तुकडोजी महाराज पुरुष बचत गट,दुर्गा महिला बचत गट शंकरपूर,संस्कृती महिला बचत गट शंकरपूर,मॉ अम्बे महिला बचत गट शंकरपूर,माऊली महिला बचत गट आणि आपले समस्त तेली समाज व सर्व गावकरी मंडळ शंकरपूर..



