शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
मराठी पत्रकारितेचे जनक स्व.बाळशास्त्री जांभेकर तसेच चिमूरचा आवाज या साप्ताहिकाचे संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सैनिक स्व.दा.ल.काळे गुरुजी यांच्या स्मृतीस अभिवादन करत चिमूर तालुका प्रेस असोसिएशनच्या वतीने पत्रकार दिन मंगळवारी सन्मानपूर्वक व उत्साहात साजरा करण्यात आला.
पत्रकार दिनाच्या औचित्याने चिमूर तालुका प्रेस असोसिएशनच्या नियोजित जागेवर आयोजित कार्यक्रमात दोन्ही थोर पत्रकार व स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन आदरांजली अर्पण करण्यात आली.यावेळी महीला पत्रकार वंदना घोनमोडे यांनी स्व.बाळशास्त्री जांभेकर व स्व.दा.ल.काळे गुरुजी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विधीवत पूजन केले
कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी मराठी पत्रकारितेच्या उभारणीत स्व.बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान अधोरेखित केले.त्यानी पत्रकारितेला समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन बनवले,तर स्व..दा ल.काळे गुरुजी यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेत पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज बुलंद केला असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.याप्रसंगी चिमूर तालुका प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष चुन्नीलाल कुडवे,सचिव कलीम शेख, उपाध्यक्ष मनोज डोंगरे,सहसचिव जितेंद्र गाडगे,तसेच सदस्य इम्रान कुरेशी,रविंद्र गोगले, जितेंद्र सहारे, फिरोज पठाण,उमेश शेभरकर, जावेद पठाण,आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पत्रकारांनी निष्पक्ष,निर्भिड व समाजहितासाठी कार्य करणारी पत्रकारिता करण्याचा संकल्प व्यक्त केला पत्रकार दिनाच्या माध्यमातून पत्रकारितेच्या मूल्यांची पुन:प्रतिज्ञा करण्यात आली.



