Home देशविदेश वाद,संवाद आणि संस्कृती…

वाद,संवाद आणि संस्कृती…

           जागतिक समस्या आणि त्यावरून भांडणे आणि लढाया, देशांतर्गत समस्या आणि त्यावरून भांडणे आणि मारामाऱ्या, प्रांतवाद आणि भांडणे, जातिवाद आणि मारामाऱ्या, धर्मवाद आणि धर्मिक हिंसा, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तेसाठी राजकीय भांडणे, कौटुंबिक कलह, 

        वरील सारी भांडणे का होतात ? याचे कारण म्हणजे काहीतरी समस्या असतात म्हणून भांडणे मारामाऱ्या होत असतात, आता तर आता तर ही भांडने हिंसा करण्यापर्यंत येऊन ठेपलेले आहेत. 

      समस्या आहेत म्हणून मतभेद आहेत, आणि मतभेद आहेत म्हणून समस्या आहेत. आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रामध्ये समस्या आहेत , त्या समस्यांबद्दल मतभेद आहेत म्हणून भांडणे आहेत. याचा अर्थ समस्या आहे भांडणाचे मूळ कारण आहे, आणि मतभेद हे दुसरे कारण आहे. 

       मानवी जीवन जगत असताना कुटुंबात असो किंवा नातेवाईकांमध्ये असो, सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक कोणतेही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये समस्या या निर्माण होतच असतात, संसारिक जीवनामध्ये अनेक समस्या आहेत. परंतु त्या समस्या का निर्माण झाल्या त्याची कारणे काय आणि त्यावर काय उपाय केला पाहिजे ? म्हणजे कारणे आणि उपाय याबद्दल मतभेद असतात, या मतभेदातूनच वाद निर्माण होतात, आणि वादातून संघर्ष पेटतो. 

      आपण म्हणतो माणूस सुसंस्कारित असला पाहिजे, मुलांना बाळावर विद्यार्थ्यावर कुसंस्कार पडू नये तर ते सुसंस्कारित झाले पाहिजेत, असे सर्वांनाच वाटते. कुसंस्कार असो की सुसंस्कार असो त्याची सुरुवात कुटुंबातूनच होत असते. कौटुंबिक समस्या आणि नातेसंबंधातील समस्या आपण कसे हाताळतो यावर संस्कार अवलंबून आहेत. कुटुंबात वाद असावा की संवाद असावा हा खरा प्रश्न आहे. कुटुंबात संवाद संस्कृती असावी किं वाद संस्कृती असावी ? यावर प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कुटुंबातील समस्या आणि नात्यांना त्यामधील समस्या प्रश्न हे संवादाने मिटवावे त की वाद करून मिटवावेत? किंवा वाद न करता संवादच असावा, असा आग्रह धरावा, यापैकी योग्य कोणते आणि आयोग्य कोणते ? हितकारक काय आणि अहितकारक काय ? याचा सेन्स असणे जरुरीचे आहे. वाद विकोपाला जातो म्हणून वादाने समस्या सुटत नाहीत किंवा सुटल्या तरी ती पद्धत बरोबर नाही, वादा ने प्रश्न मिटवण्याची पद्धत ही चुकीची पद्धत आहे, ती माणसाची किंवा माणुसकीची पद्धत नाही, म्हणून वाद संस्कृती ही कुटुंबात असं की समाजात असं की देशात असं की जगात असो रुजता कामा नये. कारण वाद हा विकोपाला जाऊ शकतो आणि वाद एकोपाला गेला की भांडणे होतात त्यातून मारामाऱ्या होतात त्यातून हिंसा होतात, आणि हिंसा म्हणजे अधर्म आणि अहिंसा म्हणजे धर्म होय,हे सर्वमान्य आहे. कुटुंबात असं की समाजात असो की देशात हिंसासंस्कृती असणे केव्हाही घातक आणि अहितकारीच असते.

   मानवी जीवन जगत असताना ज्या समस्या निर्माण होतात, त्या वाद करून न मिटवता संवाद करूनच मिटविल्या पाहिजेत, खरे तर वस्तुस्थिती किंवा वास्तविक हे आहे की, संवादानेच समस्या मिटत असतात आणि वादाने वाढतात,एकमेकांची मने कालुशीत होऊन माणसे एकमेकापासून दुरावतात. शेजारी एकमेकापासून दूर होतात, शेजारी राष्ट्र एकमेकापासून दुरावतात. दोस्त मित्र एकमेकापासून दूर होतात, कुटुंबातील नाते सुद्धा एकमेकापासून दूर होतात, अर्थात दुरावणे ही विकृती आहे आणि जवळ येणे ही संस्कृती आहे. 

     वादविवाद असावा परंतु वाद असू नये, वादे वादे जायते तत्व बोधहा, डिबेट ही कोणते विचार आणि तत्व चांगले वाईट,योग्य अयोग्य ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी करायची असते. 

     वाद ,वादविवाद,आणि संवाद या तीन शब्दाचे अर्थ आणि त्यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. वाद हा भांडणे मारामारी करण्यासाठी, वादविवाद हा संशोधनासाठी आणि संवाद हा सुखकर जीवन जगण्यासाठी असतो. समाजातून सुख शांती समाधान आणि आनंद निर्माण होत असतो, म्हणून संवाद हीच पद्धत आपण व्यवहारामध्ये वापरले पाहिजे. वैयक्तिक जीवनात असो की कुटुंबात असो की समाजात असो की देशामध्ये असो जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होतात तेव्हा तेव्हा संवाद हीच पद्धत वापरली पाहिजे जी सुसंस्कृत आहे. म्हणून संवाद म्हणजेच संस्कृती आणि वाद म्हणजेच विकृती होय. 

     ज्याला दिमाग आहे,असा माणूस विचाराने काम करीत असतो, आणि याला दिमाग नाही तो अविचारी कुविचारी बनून अन्याय अत्याचार करीत असतो. नव्हे तसे त्याच्या हातून घडत असते. एक म्हण आहे “जिसका दिमाग चलता नही उसका हात चलता है. 

    थोडक्यात सांगायचं तात्पर्य हे की,आपल्या कुटुंबात संवाद संस्कृती जपा,तिचा अमल असू द्या.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

                   फोन : 9420912209.