Home शैक्षणिक सर्वांगीण शिक्षण महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान… 

सर्वांगीण शिक्षण महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान… 

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

 साकोली :- पिंडकेपार येथील सर्वांगीन शिक्षण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे विद्यालयातील प्राचार्य अमोल हलमारे यांच्या उपस्थितीत व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक भंडारा व साकोली तालुका संघटक कागदराव रंगारी इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. 

         प्रमुख वक्ते म्हणून डी जी रंगारी यांनी सांगितले की समाजातही आजही विज्ञान युगात अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे इंटरनेट च्या युगात सुद्धा आपल्याला जर सुद्धा दिसत आहे.

          त्यामुळे भारतीय राज्यघटनेतील 51 नुसार सर्व विद्यार्थ्यांना लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे या कलमाच्या आधार घेऊन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठिकठिकाणी जाऊन विद्यालय व महाविद्यालयात जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन प्रयोगाच्या माध्यमातून रुजवण्याच्या प्रयत्न करत आहे बुवा बाबा लोकांना कसे फसवतात व तंत्र मंत्र चा आधार घेऊन नवीन चमत्कार दाखवून फसवणुकीचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात होत आहे.

           त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यात आला. त्यामध्ये नारळातून पैसे काढणे, तोंडात जळता कापूर टाकणं,हातावरून जळतात टेंबा पेटविणे ,कानाने चिट्टी वाचणे, फुलांचे कलर बदलणे, तोंडातून ब्लेड ची माळ काढणे असे विविध सादर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यात आला.

         तसेच साकोली तालुका संघटक कागदराव रंगारी यांनी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनांवर विविध गीत सादर करून प्रयोग दाखविले.

              कार्यक्रमाचे संचालन बी के दोनोडे यांनी केले तर आभार पी एल शेलोकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पी एल पधरे, टी डी कापगते,एम डी वालदे ,के टी भुते, अरुण पवार, ओ जी भुते , डे नी घरडे, पी एस भुते, सविता मारवडे, ममता ऊके ,जगन भानारकर कटरे मॅडम व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी याप्रसंगी मेहनत घेतली.