ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : स्थानिक नं.पा.कापगते विद्यालय,साकोली येथे आज दि.16/12/2025 रोज मंगळवारला दुपारी ठीक 3.00 वा.माता पालक शिक्षक संघाची सभा बहुसंख्य पालक व विद्यार्थी वर्ग यांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आली.
सभेला मंचावर अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.आर.बी.कापगते मॅडम तसेच माता पालक शिक्षक संघातील पदाधिकारी सन्माननीय डॉ.महादेव टी.लेंढे,श्री.अविशकुमार भैसारे,सौ.मीनाक्षी दीपक कापगते तथा विद्यालयातील सेवाजेष्ठ शिक्षक आदरणीय श्री.के.जी. लोथे, श्री.डी. एस.बोरकर श्री.एम.एम.कापगते व प्राध्यापिका सौ.एस.एन. गहाणे मॅडम उपस्थित होत्या.
विद्येची देवी माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरवात करण्यात आली.सभेतील महत्वपूर्ण विषय – विद्यार्थ्यांची शालेय शिस्त व अभ्यास,प्रथम सत्रांत परीक्षेचा निकाल,द्वितीय घटक चाचणी आयोजन,वर्ग 10 वी 12 वी च्या सराव परीक्षांचे आयोजन व प्रात्यक्षिक परीक्षा,शैक्षणिक सहल,NMMS व Scholarship परीक्षा आयोजन यासंबंधाने विषयवार सविस्तर माहिती श्री.आर.बी.कापगते श्री.डी. एस.बोरकर श्री.डी.आर.देशमुख व श्री.एस.व्ही.कामथे यांनी पालकांसमोर दिली.सभेतील विषयावर चर्चा होत असतांनी पालक वर्गाने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर शिक्षक वर्गाने देऊन पालकांनी केलेल्या नवीन सूचनांची अंमलबजावणी करण्याचे ध्येय निश्चित केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक व पालक एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आव्हान श्री.अविशकुमार भैसारे यांनी तर विद्यार्थी दशेत आपल्या पाल्यावर योग्य संस्कार आई वडिलांनी करावे व त्याची जपणूक होते आहे की नाही याचा शिक्षकाकडून नियमित शाळाभेटी अंती पाठपुरावा घ्यावा.आजचा पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणविषयी जागरूक असायला पाहिजे.लहान वयात मुलांना मोबाईल,दुचाकी वाहन यांचे पासून दूर ठेवावे.नियमित अभ्यासाची सवय जोपसण्यासाठी घरी पाल्याना प्रोत्साहित करण्याचे आव्हान आ.डॉ.एम.टी.लेंढे यांनी आपल्या मनोगतातून केले.
सभेच्या अध्यक्षा श्रीमती.आर.बी.कापगते यांनी पालक वर्ग मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहत नाही त्यामुळे आपल्या पाल्याची प्रगती कशी होत आहे हे पालकांना समजत नाही.मुले जशी घरात वावरतात तशीच शालेय परिसरात वावरण्याचा प्रयत्न करतात.काही मुलांना वाईट सवयी जडलेल्या आहेत त्यामुळे सकारात्मक शिस्त त्यांच्यात रुजवताना शिक्षकांना पालकाविना अडचण निर्माण होत आहे.करिता आपल्या पाल्याच्या शिक्षणाप्रती पालकांनी जागरूक होऊन शिक्षणप्रक्रियेतील विचारांचे आदानप्रदान करणारे दुवा व्हावे असे आव्हान केले.सभा यशस्वी होण्याकरिता पालक वर्ग व शिक्षक वर्ग यांनी फार मोलाचे सहकार्य केले.
सभेचे सूत्रसंचालन श्री.एस.आर.देशमुख तर आभार प्रदर्शन श्री.आर.व्ही.दिघोरे सर यांनी केले.
सभेची सांगता वंदेमातरम या गीताने करण्यात आली.



