Home देशविदेश धर्म : आवश्यकता,चिकित्सा,द्वेष…

धर्म : आवश्यकता,चिकित्सा,द्वेष…

        भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ” धर्म ” ही संकल्पना मान्य असल्यामुळे त्यांनी भारतीय राज्यघटनेत ” धर्माचे स्वातंत्र्य ” समाविष्ट केले. यामुळे भारतातील सर्वच धर्मांना अस्तित्वाचे स्वातंत्र्य मिळाले. बाबासाहेब हे आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक अध्यात्मिक सांस्कृतिक या मानवी अंगांच्या प्रत्येक क्षेत्रात माणसाला आणि माणसाच्या विचाराला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, या विचाराचे बाबासाहेब होते, म्हणजेच या विश्वातील प्रत्येक माणूस हा विचाराने किंवा शरीराने गुलाम असता कामा नये, प्रत्येक माणूस हा मानसिक दृष्ट्या आणि भौतिक दृष्ट्या स्वतंत्र असला पाहिजे, स्वातंत्र्य हाच त्याचा जीव की प्राण असला पाहिजे, या विचाराचे होते. म्हणून त्यांनी आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक अध्यात्मिक सर्वच क्षेत्रातील गुलामी नाकारली. आणि संविधानामध्ये सर्वच भारतीय नागरिकास स्वातंत्र्य बहाल केले. 

      बाबासाहेबांची ही भूमिका काँग्रेस पक्षाला मान्य होती, म्हणूनच बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार होण्यास त्यांनी मान्यता दिली, म्हणजे विरोध केला नाही. 

       परंतु स्वातंत्र्याची संकल्पना आरएसएस आणि हिंदू महासभा आणि त्यावेळचा जनसंघ पक्ष म्हणजे आजचा भारतीय जनता पक्ष यांना ” स्वातंत्र्य ही संकल्पना मान्य नाही तर गुलामी हीच संकल्पना त्यांना मान्य आहे किंवा त्यांच्या आवडीची आहे, म्हणून ते हिटलर आणि मुसोलिनी या हुकुमशाह यांना फॉलो करतात. याचा अर्थ इटली आणि जर्मनी मध्ये ज्यांनी सामाजिक क्षेत्रात वंशवाद, धार्मिक क्षेत्रात पंथवाद, आर्थिक क्षेत्रात भांडवलशाही, राजकीय क्षेत्रात हुकूमशाही स्थापन केली, आणि मानवी स्वातंत्र्याचा हक्क हिरावून घेतला, स्वातंत्र्य हा या जगातील प्रत्येक माणसाचा नैसर्गिक हक्क आहे, आणि गुलामी ही मानवनिर्मित आहे. हे समजून घेण्याची गरज आहे. 

        आरएसएस या सामाजिक संघटनेस, आणि या संघटनेचीच एक राजकीय शाखा म्हणजे भाजपा पक्ष यांना अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच ” धर्म “ही संकल्पना मान्य असली तरी धर्माचे स्वातंत्र्य मात्र त्यांना मान्य नाही, धर्माची चिकित्सा करणे सुद्धा त्यांना मान्य नाही, तर हिंदू धर्माच्या नावाने ब्राह्मणी वैदिक धर्म भारतामध्ये हा एकच धर्म असावा इतर धर्म नसावेत, ही भूमिका स्वातंत्र्यपूर्वक काळी ही होती आणि आजही आहे. म्हणून गांधीजी, सरदार पटेल, बाबासाहेब, संविधान यांचे विचार आणि कृती मान्य नसले तरी ते लोकप्रिय आहेत आणि लोकांची मते कलोशीत होऊ नये अशी भूमिका ( डावपेच ) घेऊन गांधी पटेल बाबासाहेब आणि संविधान यांचे पुढे माथा टेकवायचा आणि अगदी यांच्या विरोधातच कृती करायची, अशी दुटप्पी भूमिका घेऊन आज आरएसएस आणि भाजपा कार्य करीत आहेत, हे मतदारांच्या लक्षात येणे जरुरीचे आहे. कारण ते स्पष्ट बोलत आहेत की, धर्म स्वातंत्र्य आम्हाला मान्य नाही, संविधान आम्हाला मान्य नाही ते बदलायचे आहे, मुस्लिम आणि ख्रिश्चन हे आमचे शत्रू आहेत, 

       हा धर्म द्वेष आर एस एस आणि भाजपा यांचा आहे. या द्वेषास सर्वसामान्य च नव्हे तर विचारवंत सुद्धा बळी पडत आहेत, ज्यांना लोकशाही मान्य नाही हुकूमशाही मान्य आहे, ज्यांना वंशवाद आणि घराणेशाही मान्य आहे, समाजवाद समता मान्य नाही, त्यांना विचारवंत तरी कसे म्हणावे ? असा कोणत्याही सुज्ञ माणसाला प्रश्न पडणे साहजिकच आहे. 

     पूर्वीचे राजे धर्म संसद बोलवायचे, धर्मसभा घ्यायचे, सर्वधर्माच्या धर्मपंडितांना प्रत्येक धर्माच्या तत्त्वाबद्दल चर्चा करायला लावायची, आणि त्यातून अखिल मानव जातीस जे त्त्व तारक असतील ते तत्व स्वीकारायचे, असा राजधर्म होता, मानवता हाच खरा धर्म आहे, म्हणजेच ‘ मानवता ‘ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून ‘ धर्म ‘ह्या विषयावर चर्चा झाली पाहिजे, विचार करण्याची गरज आहे. 

        नैतिकतेसाठी म्हणून बाबासाहेबांनी धर्म ही संकल्पना मान्य केली, कारण नैतिकतेविना माणूस माणसाशी व्यवहार करू शकत नाही, स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय ही तत्वे अमलात आणू शकत नाही, हे बाबासाहेबांना अभिप्रेत होते, म्हणून त्यांनी धर्म ही संकल्पना मान्य केली, परंतु धर्म ही संकल्पनाच माणसांचे जीव घ्यायला लागते तेव्हा कार्ल मार्क्स म्हणतो की,”धर्म ही अफूची गोळी आहे, जोती घेईल, तो कायम नशेत राहील”. आजचे चित्र पाहता असेच काहीतरी दिसत आहे. हिंदू असो की मुस्लिम किंवा ख्रिश्चन असो की शेख जैन बौद्ध सर्वच धर्म ही संकल्पना मांडणारे सर्वच धर्माचे लोक माझाच धर्म श्रेष्ठ आहे आणि इतर धर्म कनिष्ठ आहेत, ही उच्चनीच्छतेची भावना म्हणजेच भेदभावाची ही भावना मनी बाळगून एकमेकांचे शत्रू बनलेले आहेत. खरे तर धर्म म्हणजे घर शेत किंवा खाजगी प्रॉपर्टी नव्हे, की जिच्यासाठी भांडणे आणि मारामाऱ्या कराव्यात, धर्म ही एक संकल्पना आहे, विचार आहे, जिचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी आणि संरक्षणासाठी होईल का ? याचा विचार करण्यासाठी म्हणून धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली. परंतु आज धर्म या संकल्पनेची अवस्था काय आहे हे आपण पाहतो आहोत. ख्रिश्चन मुस्लिम हिंदू वैदिक आणि ब्राह्मण सर्वच धर्माचे लोक हे आज धर्मांध बनलेले आहेत, प्रत्येकाला आपल्या धर्माचा गर्व निर्माण झालेला आहे, अहंकारापोटी धर्म ह्या संकल्पनेचा मूळ अर्थ ‘मतितार्थ, गर्भार्थच विसरून गेले आहेत. ” यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत “याच लोकांचा अर्थ पण चुकीचा लावीत आहेत, केवळ आपल्या स्वार्थापायी, हुकूमशाही प्रस्थापित करण्यासाठीच. या श्लोकाचा अर्थ असा होतो की, जेव्हा जेव्हा या पृथ्वीतलावर अधर्म वाढेल, म्हणजे नैतिकता लोक पावेल तेव्हा तेव्हा मी मनुष्याचा अवतार घेऊन या पृथ्वीतलावर येईन, असे ईश्वर वचन आहे, हे वचन स्वतःला धर्माचे आणि अध्यात्माचे ठेकेदार म्हणून घेणारे राजकीय आणि धार्मिक पुढारी आणि पंडित हे वचन विसरत आहेत किंवा या वचनाचा वचनाचा चुकीचा अर्थ लावत आहेत. असा अर्थ का लावीत आहेत किंवा असे वर्तन का करत आहेत याचे मुख्य कारण एकच आहे ते म्हणजे सत्ता सत्ता आणि सत्ता प्राप्ती. संपत्ती प्राप्ती. 

      दुनियेची सारी दौलत केवळ आपल्याच मालकीची होण्यासाठी म्हणजेच श्रीमंती साठी आणि श्रीमंतीची आयुष्य जिंदगी जगण्यासाठी काही स्वार्थी मुठभर लोक सर्वसामान्य जनतेस वेडे बनवून त्यांची दिशाभूल करून आपल्या हत्ती सत्ता घ्यायची, हुकूमशाही स्थापन करायची, लोकशाही मारायची, लोकांचा मतदानाचा हक्क नाहीसा करायचा, बहुजनांना शिक्षण, अन्न, पाणी, निवारा, आरोग्य, संपत्ती, धन, पैसा, सत्ता या गोष्टीपासून वंचित ठेवायचे म्हणजेच या गोष्टी त्यांना मिळू द्यायच्या नाहीत याचाच अर्थ त्यांना गुलाम करायचे, या गुलाम आणि मात्र फक्त या मूठभर लोकांसाठी आपले जीवन जगायचे, कष्ट करायचे, त्यांची सर्व घाण्यांची कामे करायची, त्यांच्या सेवेत 24 तास राबायचे, हातात बंदुका घेऊन त्यांचे त्यांचे संरक्षण करायचे, आणि आपल्या बांधवांना मारायचे, ही दुष्ट निती, काही मुठभर लोकांची आहे, आणि ते या पद्धतीचे बरोबर राजकारण करीत आहेत, त्यांच्या या दुष्ट राजकारणास बहुजनांचे नेते सुद्धा स्वार्थापाई बळी जात आहेत, याचा अर्थ ते स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड मारून घेत आहेत, कारण हे तूर्थ आपल्या पायाकडे पाहत आहेत, म्हणजे यांची नजर स्वतःच्या पायाकडे आहे, दूरवर नजर नाही, क्षितिजाकडे पाण्याची वृत्ती यांनी संपविली आहे, परंतु या त्यांच्या कृत्यामुळे बहुजनांचे हे सारेच नेते उद्या गुलामी व्यवस्थेत जगणार आहेत, हे त्यांना कधी समजेल? एक चिंतेची बाब आहे. 

     यासाठी बहुजनांनी बहुजनांच्या नेत्यांच्या मागे न लागता आता आपण आपला स्वतंत्र विचार केला पाहिजे, आपल्या नेत्यांवर अवलंबून चालणार नाही, कारण उद्याची गुलामी त्यांना आजच दिसलेली आहे, म्हणून त्यांना उंची उंची बंगले, उंची उंची खाणे, उंची उंची कपडे, उंची उंची गाड्या देऊन गुलाम केल्या गेले आहे, हे सारे उंची उंची गुलामी व्यवस्था येईल तेव्हा संपेल, शेवटी मनुस्मृतीची राज्यघटना या देशाला लागू होईल, नवे ती लागू करण्याचे आमचे स्वप्न आहे असे हे लोक स्पष्ट बोलून दाखवत आहेत, तरीही बहुजन नेत्यांचे डोळे उघडत नाहीत, किती हा स्वार्थ, याचा अर्थ आमच्या स्वार्थासाठी उद्याचीच काय पण आजची ही गुलामी व्यवस्था आम्ही मान्य करायला तयार आहोत, अशीच ही बहुजन नेत्यांची मानसिकता दिसते आहे, यासाठी ज्यांचे ज्यांचे शोषण होत आहे, जे जे महागाईने बेकारीने त्रस्त आहेत, शेतकरी कष्टकरी मजूर यांना वाईट दिवस येत आहेत, अशा सर्वांनी संघटित होऊन, आपणास गुलामीत ठेवू इच्छिणाऱ्या सर्व राजकर्त्यांना सत्तेच्या बाहेर कसे ठेवता येईल याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. 

        सारा बहुजन समाज धर्म या संकल्पनेचा बळी ठरलेला आहे, धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे, धर्म म्हणजे पूजा अर्चा नव्हे, धर्म म्हणजे 24 तास देव देव करणे नव्हे, तर धर्म म्हणजे नैतिकता, स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय याचा मूलाधार आहे, असा विचार करणे जरुरीचे आहे. आणि हा विचार फक्त भारताचे संविधानाणे तिला आहे. 

        भारतीय संविधान हे सर्वसमावेशक आहे. यात सर्वच धर्म आणि सर्व संस्कृती यांना स्वातंत्र्य देते. हिंदू राष्ट्राचे संविधान मात्र स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय या नैतिक गोष्टींना किंवा तत्वांना मान्यता देत नाही, देणार नाही, हिंदुराष्ट्र असो की मुस्लिम राष्ट्र असो की ख्रिश्चन राष्ट्र असो, ज्या राष्ट्रांचा पाया हा मुळीच धर्म आहे अशी राष्ट्र टिकू शकत नाहीत आणि टिकू शकले नाहीत असा हा धार्मिक राष्ट्रांचा इतिहास आहे, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. यासाठी सर्वधर्मसमभावाची, आणि धर्मनिरपेक्ष सरकारची भूमिका घेतल्याशिवाय कुणालाही धार्मिक स्वातंत्र्य मिळणार नाही, आणि धर्म संकल्पना हीच साकार रूप घेणार नाही. या पृथ्वीतलावर धर्माचा आधार घेऊन कोणताही धर्म टिकणार नाही. तर सर्वधर्म समभावाचा आधार घेऊनच सर्वधर्म टिकू शकतील, अन्यथा धर्माधर्मा ंमध्ये असलेला हा द्वेष मत्सर कपट गर्व अभिमान अहंकार सर्वांनाच गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही. 

     यासाठी ख्रिश्चन असो की मुस्लिम असो की हिंदू असो कोणीही धर्मांध होऊन धर्म द्वेष करू नये उलट इतर धर्माचा आदर करावा, धार्मिक क्षेत्रात ‘ बंधूभाव ‘आणि शेजार धर्म निभवावा. तरच ही मानव जात या पृथ्वीतलावर जिवंत राहील अन्यथा सारी मानव जातच या धर्माच्या नावाने नष्ट होईल. धर्माचे दुष्परिणाम पाहता हजारो वर्षापासून या धर्माने दरवर्षी हजारो बळी घेतलेले आहेत, तरीपण या 21 व्या शतकातील शिक्षण घेतलेला माणूस अजून शहाणा होत नाही, ही चिंतेची बाब आहे. 

      तुकाराम महाराजांनी सांगितले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, नाही भेदाभेद वर्म अमंगळ. संत तुकडोजी महाराज म्हणाले, सबके लिए खुला है मंदिर हमारा, अशोक कोई भी पंथी असो कोई भी धर्मी, देशी विदेशी योगा मंदिर यह हमारा, येता तरी सुखी या जाता तरी सुखी जा. गाडगे महाराजांनी सुद्धा धर्माचा खरा अर्थ सांगितला, तो म्हणजे कोणीही कोणीही जातीचा धर्माचा असला तरी भुकेलेल्याला अन्न तहानलेल्या पाणी, नागड्यांना वस्त्र द्या. हाच खरा धर्म होय. साने गुरुजी तर म्हणतात, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. ही आपली खरी भारतीय परंपरा आहे, भारतीय संतांची भूमी आहे आणि भारतीय संतांची ही शिकवण आहे, ही शिकवण आपण या मुस्लिम आणि हिंदू धर्मांध लोकांच्या नादी लागून शिकवण विसरून जात आहोत, माणसाने माणसाच्या जन्माला आल्यानंतर माणसाने माणसाशी माणसासारखेच वागले पाहिजे, जनावर जनावरासारखे वागता कामा नये, म्हणून माणसाची खरी जात ही माणुसकीच आहे, आणि माणसाचा खरा धर्म हा मानवता धर्मच आहे. ही शिकवण प्रत्येक जातीचे आणि धर्माच्या माणसांनी अंगीकारली तर धर्म म्हणजे द्वेष मत्सर करणे नव्हे तर धर्म म्हणजे बाईचारा बंधुभाव आहे हे लक्षात येईल. 

     धर्म ही संकल्पना माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी निर्माण झालेले नसून माणसाचे अस्तित्व टिकविण्यासाठी निर्माण झालेली आहे, हे एकदा लक्षात घेतले की मग धर्माविषयीचे अज्ञान दूर व्हायला वेळ लागणार नाही. 

      लेखक: दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 14 डिसेंबर 2025. फोन : 9420912209.