उपक्षम रामटेके/शुभम गजभिये…
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा चिमूर येथील कार्यालयाचे उपविभागीय अभियंता पोटुडे व कनिष्ठ अभियंता मेश्राम यांनी मौजा महादवाडी येथील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आर.ओ.प्लाॅन्ट बसवून देतो अशी लेखी सहिनिशी दिनांक ०१/०९/२०२५ ला दिली होती.
याचबरोबर चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये झालेल्या सामूहिक चर्चातंर्गत बैठकीनंतर,”सरपंच भोजराज कामडी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी,”मौजा महादवाडी गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पंधरा वित्त आयोगाच्या रकमेतून दिड लाख रुपये देण्याचा (खर्च करण्याचा) ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ठराव केला व तो ठराव गटविकास अधिकारी चिमूर आणि जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे यांना दिला.
मात्र,गटविकास अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये झालेल्या सामूहिक चर्चातंर्गत बैठकीनंतर सरपंच भोजराज कामडी यांनी ग्रामपंचायत मासिक सभेचा ठराव गटविकास अधिकारी प.स.चिमूर व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे यांना दिल्यानंतर सुध्दा त्यांना आपल्या शब्दावर कायम राहता आले नाही.
म्हणजेच आर.ओ.प्लाॅन्ट साठी लागणाऱ्या उर्वरित निधीची व्यवस्था जि.प.ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालय चिमूरचे उपविभागीय अभियंता पोटुडे यांना करता आली नाही…
परंतु भर पावसाळ्यात मौजा महादवाडी येथील नागरिकांना आर.ओ.प्लाॅन्ट बसवून स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्याच्या शब्दाला उपविभागीय अभियंता पोटुडे यांना जागता आले नाही असे दिसून येते आहे.यामुळेच त्यांना मौजा महादवाडी येथे आर.ओ.प्लाॅन्ट बसवून देण्यासाठी यशस्वी होता आले नाही.
उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी जल जिवन मिशन अंतर्गत मौजा महादवाडी येथे कामाला पावसाळा लागताना सुरुवात केली.यामुळे मौजा महादवाडी येथील नागरिकांना अस्वच्छ पाणी चार महिने प्यावे लागले.तर काही नागरिकांनी मौजा पेंढरी वरुन स्वच्छ पाणी आणून तहान भागवावी लागली.
मात्र मौजा महादवाडी येथील नागरिकांना नळ योजनेच्या अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे भर पावसाळ्यात झालेला त्रास अतिशय वेदनादायक,त्रासदायक व वारंवार मानसिक संतुलन बिघडवणारा होता,आरोग्याची हानी करणारा होता.
मात्र संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांच्या कॅबिनमध्ये झालेल्या बैठकीतील तडजोडी नुसार उपविभागीय अभियंता पोटुडे यांनी मौजा महादवाडी येथे आर.ओ.प्लाॅन्ट बसवून देण्यासाठी आवश्यक कार्यालयीन हालचाली केल्या नसल्याचे सरपंच भोजराज कामडी यांचे म्हणणे आहे..
शब्दाला न जाणाऱ्या व विश्वासघात करणाऱ्या उपविभागीय अभियंता पोटुडे यांच्यावर आता विश्वास दाखवता येत नाही असेही सरपंच भोजराज कामडी यांचे म्हणणे आहे.
गावातील नागरिकांना स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्यासाठी उपविभागीय अभियंता पोटुडे यांच्या सोबत महत्त्वपूर्ण कायदेशीर संघर्ष करणार आणि आता शेवटचा कायदेशीर संघर्ष असणार असे सुतोवाच सरपंच भोजराज कामडी यांनी सोडले आहेत.
उपविभागीय अभियंता पोटुडे यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे येणाऱ्या १७ डिसेंबरला सरपंच भोजराज कामडी यांना आत्मदहन करण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल..
परंतु संबंधित अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीला व त्यांच्या वेळकाढू धोरणाला तेच जबाबदार आहेत असे म्हणणे चुकीचे ठरु नये.
मौजा महादवाडी गावातील नागरिकांना मागिल चार महिने अस्वच्छ पाणी पाजणारे व वेळ मारुन नेणारे उपविभागीय अभियंता पोटुडे हे कर्तव्यदक्ष,कर्तव्यक्षम,संवेदनशील असूच शकत नाही असे सरपंच भोजराज कामडी यांचे म्हणणे न्यायोचितच नाही का?
*****



