प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर तालुक्यात हल्लेखोर वाघांनी चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतातच बळी घेतला तर काही नागरिकांचाही आवागमन करतांना बळी घेतला.याचबरोबर अनेक पाळीव प्राण्यांची शिकार केली.तद्वतच अनेक गुराख्यांवर जिवघेणा हल्ला केला.
यामुळे चिमूर तालुक्यात अनेक हल्लाखोर व नरभक्षक वाघांचा वावर असल्याचे निश्चित झाले आहे.सदर हल्लेखोर व नरभक्षक वाघ हे कुठल्या वनपरिक्षेत्रातून चिमूर तालुक्यात येतात हे अनिश्चित असले तरी चिमूर तालुक्यात हल्लेखोर व नरभक्षक वाघांचा वाढणारा वावर अतिशय चिंताजनक आहे.
चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा,नागरिकांचा,गुराख्यांचा,बालबालीकांचा,विद्यार्थ्यांचा,मजूरांचा,महिलांचा,युवक-युवतीचा,बेरोजगारांचा,सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पाळीव प्राण्यांचा हल्लेखोर वाघ केव्हा जिव घेईल याचा नेम नसल्याने तालुक्यातील सर्व मनुष्यप्राणी सध्यातरी भितीच्या सावटाखाली आहेत.
हल्लेखोर व नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सर्थीचे प्रयत्न करीत असले तरी चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या जिवित हानीच्या भितीचे काय? हा प्रश्न अधिकच गंभीरता निर्माण करतो आहे.
हल्लेखोर व नरभक्षक वाघ आणि वन अधिकाऱ्यांची कर्तव्ये या संदर्भात सांगायचे झाल्यास,वन अधिकारी मानवी वस्तीत शिरणाऱ्या व परिसरात वावरणाऱ्या वाघांना हाताळतात,ज्यामध्ये लोकांना सूचना देणे (एकटे शेतात जाऊ नका),अतिरिक्त कर्मचारी तैनात करणे,पिंजरे लावणे आणि २४ तास वाघावर लक्ष ठेवणे यांसारख्या तातडीच्या उपाययोजनांचा समावेश असतो.
तसेच दीर्घकालीन उपाय म्हणून,मानवी संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबासारख्या ठिकाणांहून वाघांचे स्थलांतर करणे आणि मृतांच्या कुटुंबांना सरकारी नोकरी देण्यासारख्या योजनांवर महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे.
वन अधिकाऱ्यांची कर्तव्ये (Duties of Forest Officers)
तातडीच्या उपाययोजना (Immediate Actions)
सूचना आणि जनजागृती म्हणजे लोकांनी वाघांपासून सावध राहणे आणि एकटे फिरू नये असे आवाहन करणे होय.
तद्वतच वाघाचा माग काढण्यासाठी आणि चिंताजनक गंभीर परिस्थितीला हाताळण्यासाठी अतिरिक्त वन कर्मचारी पाठवणे,पिंजरे लावणे,हल्लेखोर वाघाला पकडण्यासाठी पिंजरे बसवणे,२४ तास पाळत ठेवणे,पुढील घटना टाळण्यासाठी वाघावर २४ तास लक्ष ठेवणे,यांसारख्या उपाययोजना वनविभाचे अधिकारी करतात.
तसेच दीर्घकालीन उपाय म्हणून (Long-term Solutions):
वाघांचे स्थलांतर करण्यामागे मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा हेतू वनविभागाचा आहे.याचबरोबर ताडोबा-अंधारी सारख्या ठिकाणांहून वाघांना सह्याद्रीसारख्या नवीन क्षेत्रात स्थलांतरित करण्याची परवानगी घेतल्या जातय.
प्रामुख्याने नैसर्गिक अधिवास कमी झाल्याने वाघ मानवी वस्तीत येत आहेत,ज्यामुळे वाघ व मानवी संघर्ष वाढत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील १५ वर्षांत अनेक लोक वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले.काही वाघ (उदा. टी-२४ ‘उस्ताद’) नरभक्षक बनतात,ज्यामुळे त्यांना पकडणे किंवा मारणे आवश्यक ठरते.
वन अधिकारी हल्लेखोर व नरभक्षक वाघांमुळे उद्भवणारी तातडीची परिस्थिती हाताळतात आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर काम करतात,ज्यात धोरणात्मक निर्णय आणि जनजागृतीचा समावेश असतो.
ताडोबा अंधारी अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे. या अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ ६२५.४ चौरस किमी (२४१.५ चौरस मैल) आहे.
वन्यप्राणी आणि वन अधिकारी हे जंगले,वन्यजीव आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व व्यवस्थापन करतात.
पण,नरभक्षक वाघांचा वावर हा अभयारण्ये सोडून ग्रामीण भागात होवू लागल्याने चिमूर तालुक्यातील नागरिक हे हल्लेखोर वाघांचा दहशतीत आले आहेत.
यामुळे महाराष्ट्र राज्याच्या वनमंत्र्यांनी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी,”नरभक्ष व हल्लेखोर वाघांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक नाही काय?हा प्रश्न मानवी मनात भिती मुक्ततेची भावना तिव्र करतो आहे.



