Home Social श्रीकांत तापकीर मित्र मंडळाकडून आरोग्यदूतांच्या सेवेला सलाम; चर्होलीत शनिवारी गौरव समारंभ…

श्रीकांत तापकीर मित्र मंडळाकडून आरोग्यदूतांच्या सेवेला सलाम; चर्होलीत शनिवारी गौरव समारंभ…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

चर्होली बुद्रुक : समाजाच्या आरोग्य संवर्धनात, प्रतिबंधक आरोग्य चळवळींत, रुग्णसेवा, जनजागृती आणि संकटकाळातील मदतकार्य यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आरोग्यदूतांचा गौरव युवा नेते श्रीकांत तापकीर मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी (दि. १३) करण्यात येणार आहे. खोलेश्वर मंदिरासमोरील फार्महाऊस येथे सायं. ६.३० वाजता होणाऱ्या या समारंभाला स्थानिक ग्रामस्थ आणि मान्यवरांची उपस्थित राहणार आहे.

          आरोग्यसेवा ही केवळ वैद्यकीय उपचारांची मर्यादित चौकट नसून समाजाच्या जीवनमान उंचावण्याची सामूहिक जबाबदारी असल्याचे युवा नेते श्रीकांत तापकीर यांनी यावेळी सांगितले. “परिसरातील अनेक आरोग्यदूत कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने कार्यरत आहेत. त्यांच्या सेवेमुळे अनेकांचे जीव वाचले, अनेक कुटुंबांना आधार मिळाला आणि आरोग्य जनजागृतीची चळवळ अधिक बळकट झाली,” असे ते म्हणाले.

         “या सेवाभावी कार्यकर्त्यांचे ऋण फेडणे शक्य नाही; मात्र त्यांच्या योगदानाचा सन्मान करून समाजापुढे आदर्श ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. त्यातूनच या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे,” असे श्रीकांत तापकीर यांनी स्पष्ट केले.