युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय आसेगाव पूर्णा येथे रासेयो, समाजशास्त्र विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 6 डिसेंबरला 69 वा महापरिनिर्वाण दिन व अतिथी व्याख्यान संपन्न झाले.
व्याख्यानाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ.रविंद्र इचे उपस्थित होते. तर व्याख्यानाचे प्रमुख अतिथी डॉ.हरीश काळे यांची उपस्थिती लाभली. व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.भारत कल्याणकर उपस्थित होते.
सूत्रसंचालन,प्रस्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आशिष काळे यांनी केले, आभार सोनम आमझरे हिने केले,व्याख्याना करिता डॉ.प्रविण सदार,प्रा.विपीन लिल्हारे रासेरो स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



