शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
ग्रामपंचायत शंकरपूर येथे श्री.संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची 401 वी जयंती उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या प्रारंभी संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच अशोक चौधरी,श्री. संताजी शोभायात्रा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अविनाश सहारे,युवा कार्यकर्ते श्री.आदित्य आदमने तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री. विजय गजभीये,श्री.सादिक शेख,श्री.रवींद्र राखडे,श्री.आकाश शामकुरे,श्री. राजू बघेल,श्री.बाळा ढोक,श्री.सचिन निकुरे,श्री.राम शेरकी उपस्थित होते.
भगवंताची भक्ति,सामाजिक समता आणि मानवसेवेचा संदेश देणाऱ्या संताजी महाराजांच्या विचारांचे स्मरण करून ग्रामस्थांनी त्यांचे जीवनमूल्य अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.



