Home Social पळसगांवात कॅण्डल मार्च काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

पळसगांवात कॅण्डल मार्च काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

      चिमूर तालुकांतर्गत मौजा पळसगांवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज संध्याकाळी ६.३० वाजता पासून कॅन्डल मार्च काढून महामानवास अभिवादन केलाय.

                      डॉ‌‌‌.बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध,महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

       याप्रसंगी पळसगांव ग्रामपंचायतच्या सरपंच्या सरीता गुरुनुले,गावातील पोलीस पाटील रागिना दडमल,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे अध्यक्ष कैलास खोब्रागडे,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव संजय जुमळे,उपासंक उपासिका गावांतील नागरिक आवर्जून उपस्थित होते‌.

               महामाया महिला मंडळचे अध्यक्ष जयवंता रामटेके,महामाया महिला मंडळचे सचिव लता खोब्रागडे,मनोहर मेश्राम,बटाऊ शेंडे,महादेव पाटील,सिध्दार्थ रामटेके,प्रदिप गजभिये,नरेश पाटील,सुनिता पाटील,उपासंक उपासिका व गावातील नागरीक आवर्जून उपस्थित होते.