Home Maharashtra साधन व्यक्तीला नियमित काम द्यावे याबाबत ग्राम साधन व्यक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर...

साधन व्यक्तीला नियमित काम द्यावे याबाबत ग्राम साधन व्यक्ती संघटना जिल्हा चंद्रपूर पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी…

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी..

      महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय,मुंबई ३२ तर्फे ग्राम साधन व्यक्तीची निवड झाली असल्याने त्यांना नियमित काम देण्यात यावे,अश्या आशयाची मागणी ग्राम साधन व्यक्ती संघटना चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

        ग्राम साधन व्यक्ती संघटना चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी संदर्भ अन्वये निदर्शनास आणून दिले की,- १) जाहिरात क्र.जीकागो रोहयो । सकाअ/कवि/१०१/२०२३ दि. २१/०८/२०२३ प्रमाणे. उपजिल्हाधिकारी (रोहयो) जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर नुसार साधन व्यक्तींच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.

           वरील दिलेल्या जाहिराती नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम पातळीवर झालेल्या कामाचे सामाजिक अंकेक्षण (social audit) करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात १०० ग्राम साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली असून या पद भरतीला पूर्ण २ वर्ष झालेले आहे.

           दोन वर्षामध्ये ग्राम साधन व्यक्ती यांना एका वर्षातून फक्त काही महिने काम दिले जात असते.ते काम पूर्ण झाले की,अनेक महिने हाताला काम नसते.त्यामुळे शासनाने पॅनल मध्ये १०० ग्राम साधन व्यक्तींची निवड करूनही अनेक महिने बेरोजगार रहावे लागत असल्याने कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत असते. 

          त्यामुळे सामाजिक न्याय व सक्षमता मंत्रालय अतर्गत अनुदान प्राप्त संस्थांचे सामजिक अंकेक्षण,स्वच्छता कामगारांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी सामाजिक अंकेक्षण,तसेच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य योजना,इमारत व इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ,राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३,प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान (माध्यान भोजन योजना), समग्र शिक्षा अभियान,प्रधानमंत्री आवास योजना शहरी,१५ वा वित्त आयोग,स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण),अन्नासाहेब पाटील आर्थिक मागासवर्ग विकास मंडळ इत्यादी.शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सोसायटी‌द्वारे शासनाच्या विविध योजनाचे सामाजिक अंकेक्ष करण्यात येऊन पॅनल मध्ये निवड झालेल्या ग्राम साधन व्यक्तींना सामाजिक अंकेक्षण चे (Social Audit) नियमित काम उपलब्ध करून देण्यात यावे असे निवेदनात नमूद केले आहे.

          योजनेचे सामाजिक अंकेक्षण करण्याच्या दृष्टीने आपल्या माध्यमातून तसा शासनाला प्रस्ताव पाठवून सामाजिक अंकेक्षण प्रक्रिया करावेत.आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करून सहकार्य करावे,आम्ही आपले ऋणी राहू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

         निवेदनाच्या प्रती माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार,आमदार किशोर जोरगेवार,प्रधान सचिव ग्रामविकास मंत्रालय मुंबई,आयुक्त,महाराष्ट्र रोजगार हमी योजना मुंबई,श्री.विनय गौडा जिल्हाधिकारी जिल्हा चंद्रपूर,श्री.पुलकित सिंह,मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत.

             निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष प्रमोद राऊत,सचिव जयंत रामटेके व इतर पदाधिकारी उपस्थित होते.