बाळासाहेब सुतार
निरा नरशिहपुर प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निरा व भिमा नद्यांच्या पट्ट्यातील शेतशिवारात ऊसाच्या पिकावर आचानक तुरा येत आसल्याने ऊसाच्या वजनात 15 ते 25 टक्के घट येण्याची शक्यता आहे. संपुर्ण हंगामात पडलेला सततचा अवकाळी रिमझीम पाऊस आणि हवामानात झालेला प्रचंड बदल. त्याचा थेट परिणाम ऊसाच्या पिकावर झाला आहे.
दोन नद्यांच्या पट्ट्यातील नरशिंहपुर, टणु , पिंपरी बुद्रुक,गोंदी, लुमेवाडी, सराटी, गणेशवाडी, ओझरे,लिंबुडी, गिरवी, आदी परिसरात उसाच्या पिकाला तुरे दिसत आहेत. या तुर्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतातुर झालेला आहे. ऊसाची कांडी आतुन पोकळ होणे, पानामध्ये छिद्रे पडणे, नवीन कोंब ऊसाला येने अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसुन येत आहेत.
अनेक साखर कारखाने आजूबाजूला आसल्यामुळे निरा व भीमा नदीच्या पट्ट्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. ऊस वेळेत न तुटल्यास वजन घटणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली.
ग्रामिण भागातील शेतकऱ्यांचे आर्थकारण ऊसाच्या ऊत्पन्नावर अवलंबुन असुन वर्षाच्या कोटुंबीक खर्चाचे आर्थीक नियोजन सुरु असते. परंतु ऊस परिपक्व झाला नसतांना सुध्दा ऊसाला तुरें आल्यामुळे ऊस उत्पादनात घट येणार आहे. त्यामुळे शेतकरी आपला ऊस गाळपासाठी लवकर जावा म्हणुन साखर कारखान्याकडे चकरा मारत आसताना दिसत आहेत.
केळी, डाळिंब, फळभाज्या पिक परवडेना म्हणुन ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे.
शिवाय यावर्षी सततच्या पावसामुळे कारखाण्याचा ऊस गळीत हंगाम एक महिणा उशीरा सुरु झालेला आहे. त्यातच हवामानाचा बदल व सततच्या पावसामुळे ऊस परिपक्व न होताही ऊस पिकाला तुरा आलेला आहे.
ऊस गाळपस घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे.आर्थिक नुकसान टाळावे यासाठी उपाययोजना कराव्या आशी मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहे.



