Home Social केशरवाही येथे अंगणवाडीचे लोकार्पण संपन्न…. — सरपंच प्रीती गोहने यांच्या पुढाकारातून...

केशरवाही येथे अंगणवाडीचे लोकार्पण संपन्न…. — सरपंच प्रीती गोहने यांच्या पुढाकारातून जिल्हा वार्षिक योजनेतून काम पूर्णत्वास…

     सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

सावली :- तालुक्यातील मौजा हिरापूर ग्रामपंचायत अंर्तगत येणारे केशरवाही या गावात भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून अंगणवाडीचे लोकार्पण करण्यात आले.

                अंगणवाडी म्हणजे भारतातील एक ग्रामीण बाल संगोपन केंद्र आहे, जे ६ वर्षांखालील मुले, गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी आरोग्य, पोषण आणि शिक्षण सेवा पुरवते. ही केंद्रे ‘एकात्मिक बाल विकास सेवा’ (ICDS) कार्यक्रमाचा भाग आहेत,केशरवाही येथील गावकाऱ्यांनी सरपंच प्रीतीताई गोहने यांचेकडे गावात अंगणवाडीसाठी मागणी केली होती.

              त्या अनुषंगाने सरपंच प्रीती गोहने यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत आपल्या विशेष प्रयत्नातून केशरवाही येथे अंगणवाडी बांधली व त्याचे आज भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती सावलीचे गट विकास अधिकारी कोमलवार विस्तार अधिकारी परसावार,देवतळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लोकार्पण करण्यात आले.

                   भारतीय संविधान दिना निमित्य भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.

            याप्रसंगी ग्रामपंचायत कार्यालय हिरापूरचे सरपंच सौ.प्रितीताई गोहने,उपसरपंच श्री.शरद कन्नाके,ग्रामपंचायत सदस्य श्री.वामन भोपये,श्री.प्रमोद भोपये, सदस्या सौ.निता मुनघाटे , सौ.सरिता भोयर,श्री.रुमाजी कोरडे,ग्रामपंचायत अधिकारी श्री.सुजित येरोजवार तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशरवाही येथील शिक्षक श्रीरामवार सर,विद्यार्थी ,ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.