Home Social जेएसपीएम महाविद्यालयात ‘संविधान दिन’ साजरा…

जेएसपीएम महाविद्यालयात ‘संविधान दिन’ साजरा…

  भाविकदास करमनकर

    धानोरा तालुका प्रतिनिधी 

          येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा- संचालित , श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे, कला – वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग आणि रासेयो विभागाच्या वतीने ‘ संविधान दिनानिमित्य प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन ‘ घेण्यांत आले.

           याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्धानी इतिहास विभाग प्रमुख डॉ.राजू किरमीरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन आदरांजलीने करण्यात आली.

        यावेळी संविधानातील प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यांत आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विणा जम्बेवार, डॉ.गणेश चुदरी, डॉ. हरीष लांजेवार यांच्यासह डॉ. संजय मुरकुटे डॉ. प्रवीण गोहणे डॉ. दामोधर झाडे डॉ. सचिन धवनकर प्रा. मांतेश तोंडरे डॉ. नितेश पुण्यप्रेड्डीवार प्रा. कैलाश खोब्रागडे प्रा. टिकाराम धाकळे प्रा. निवेदिता वटक प्रा. भाविकदास करमनकर प्रा. विराग रणदिवे प्रा वसंत आवारी यांची उपस्थिती होती.

      उपस्थितांनी संविधान पालन आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले संविधान दिनाविषयी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश बनसोड यांनी प्रास्ताविक मनोगतातून संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधूता या मानवी मूल्यांचे महत्व अधोरेखित केले.

        संचालन प्रा.प्रशांत वाळके तर आभार प्रदर्शन डॉ. प्रियंका पठाडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी श्री मानापूरे श्री लांबट श्री गोहणे श्री कायते श्री बोंगीरवार श्री नन्नावरे श्रीमती चंदेल यांच्यासह सांस्कृतिक व रासेयो विभागाच्या सर्व सदस्य विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.