Home Social ग्रामगीता महाविद्यालयात “संविधान दिन” साजरा… 

ग्रामगीता महाविद्यालयात “संविधान दिन” साजरा… 

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

             ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 26 नोव्हेंबर हा दिन “संविधान दिन” म्हणून साजरा करण्यात आला.

      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य,डॉ.सुनंदा आस्वले होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. हरेश गजभिये राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर,प्रा.डॉ. संदीप सातव,प्रा.डॉ.हुमेशवर आनंदे,प्रा.डॉ.निलेश ठवकर हे उपस्थित होते. 

         याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी संविधान दिनाचे महत्त्व व त्याची व्याप्ती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी,देशासाठी केलेल्या योगदान व कार्याबद्दल मार्गदर्शन केले. 

        त्याचप्रमाणे इतर प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा आपल्या मार्गदर्शनातून संविधान दिनाचे महत्त्व पटवून दिले.या कार्यक्रमाचे संचालन व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख,प्रा.डॉ. सुमेध वावरे यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन प्रा.समीर भेलावे यांनी केले.

         या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपली उपस्थिती दर्शवली.