Home क्रीडा आई, वडिल विद्यालयाची साथ व समाजाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे माझी निवड झाली...

आई, वडिल विद्यालयाची साथ व समाजाचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे माझी निवड झाली याचा मला आनंद आहे :- श्रीहरी सुतार यांचे उद्गार — शेवते येथील श्रीहरी बाळासाहेब सुतार यांची आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड….

 बाळासाहेब सुतार 

निरा नरशिंहपुर प्रतिनिधी 

         एस.बी. पाटील तालुका इंदापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, इंदापूरचा विद्यार्थी आणि पंढरपूर तालुक्यातील शेवते गावचा श्रीहरी बाळासाहेब सुतार याची आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

          निवडी प्रसंगी श्रीहरी सुतार बोलत असताना म्हणाले की,माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद कुटुंबाची आणि सुतार समाजाची पुण्याई, एस बी पाटील विद्यालयातील प्राचार्य व सर्व शिक्षक वर्ग गुरुनी, या सर्वांच्या सहकार्यानेच माझी आंतर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये निवड झाली याचा मला अभिमान आहे. श्रीहरी सुतार निवडी प्रसंगी बोलत होते.  

         पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती मार्फत आंतर महाविद्यालयीन खो-खो (मुले) स्पर्धा नुकत्याच पुणे येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय, आकुर्डी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेतून निवड समितीने एस.बी. पाटील इंदापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालय, येथे अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असलेल्या श्रीहरी सुतार या खेळाडूची आंतर विभागीय स्पर्धेसाठी विद्यालयाच्या वतीने निवड केली आहे.

         श्रीहरी सुतार यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक शिक्षक स्टॉप यांच्यासह शेवते ग्रामस्थ इंदापूर तालुका आणि पंढरपूर तालुक्यात कौतुक केले.