Home Maharashtra महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधातील जाहीर निषेध आंदोलन ठरले...

महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधातील जाहीर निषेध आंदोलन ठरले यशस्वी,मौजा शंकरपूर वाशियांचे भक्कम पाठबळ… — लेखी आश्वासनानंतर उपसरपंच अशोक चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांचे निषेध आंदोलन मागे…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

      महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांच्या सातत्यपूर्ण निष्काळजीपणा,अकार्यक्षमता आणि मुद्दाम केलेल्या दुर्लक्षाविरोधात शंकरपुर येथील उपसरपंच अशोक चौधरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध आंदोलन बाजार चौकातील पाण्याच्या टाकीवर २४ नोव्हेंबरला केले. 

          या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर व पोलीस विभाग यांच्यावर पडले.यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या स्थळी आले व १ महिन्याच्या आत अपुर्ण काम पुर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.यामुळे उपसरपंच अशोक चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.

       आठवडी बाजार,पाण्याच्या टाकीजवळ दिनांक 24 नोव्हेंबर 2025 ला दुपारी 12 वाजता आंदोलक उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी,ग्रामपंचायत शंकरपूर यांना लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

               संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाची तीव्रता स्पष्टपणे जाणवली असून,सर्व मागण्या मान्य करत १ महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे लिखित आश्वासन द्यावे लागले.

       ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थ,पोलीस अधिकारी व उपस्थित बांधवांचे मनःपूर्वक आभार उपसरपंच अशोक चौधरी यांनी मानले आहे.

      अत्यंत तीव्र इशारा,शब्द तिखट,भूमिका स्पष्ट,यामुळे आश्वासन मान्य केले आहे.पण आंधळा विश्वास ठेवलेला नाही असे उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे.

        येत्या १ महिन्यात जर कामात विलंब,टाळाटाळ,खोटे अहवाल,फाईल दडवणे,किंवा पळवाट काढण्याचा किंचितही प्रयत्न झाला तर मग हे स्पष्ट समजावे की शंकरपूर एकदा रस्त्यावर उतरला तर संपूर्ण विभाग हलवून सोडण्याची ताकद ठेवतो असा इशारा उपसरपंच अशोक चौधरी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

          १ महिन्याच्या आत आश्वासनानुसार कामाला सुरुवात झाली नाही तर त्या वेळी विभागीय कार्यालये ठप्प करणारे प्रचंड जनआंदोलन,रात्री-दिवस सुरू राहणारे सतत धरणे आंदोलन,जिल्हा प्रशासनाला हलवून टाकणारा घेराव,राज्यस्तरावर पोहोचेल असा तीव्र मोर्चा,मंत्रीस्तरावर दबाव निर्माण करणाऱ्या जनकारवाया,या सर्व कायद्याने मान्य पण अत्यंत कठोर पद्धतींचा आम्ही अवलंब करू,आम्ही संघर्ष करण्यास तयार आहोत आणि टोकापर्यंत लढण्यासाठीही पूर्ण सज्ज आहोत असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे.

     पाण्याच्या टाकीवर तिव्र आंदोलनात उपसरपंच अशोक चौधरी सह वंचितचे जिल्हा युवा अध्यक्ष शुभम मंडपे,निखील गायकवाड,शंकर शेरकी,किशोर चौधरी यांनी सहभाग घेतला होता.

      या आंदोलनाला मौजा शंकरपूर वाशियांनी प्रचंड प्रमाणात सहभाग घेतला असल्याने त्यांना उर्वरित कामाची झड चांगलीच पोहोचली आहे असे दिसून आले.