वृत्तवेध
युवराज डोंगरे
उपसंपादक
दर्यापूर येथिल बसस्थानक विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे.बस स्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून प्रवाश्यांच्या मुलभूत सोयी-सुविधेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दर्यापूर येथिल बसस्थानकाच्या आवारात अतिक्रमणधारक कचरा आणून टाकत आहेत.तो कचरा अनेक दिवस पडून राहतो.त्या कचऱ्यामध्ये रिकाम्या पाणी बॉटल,कॅरीबॅग,सडलेली फळे,केरकचरा हा बसस्थानक आवारातच फेकला जात आहे.दर्यापूर बस स्थानकात सफाई कामगार असतांनाही घाणीचे साम्राज्य का पसरते? असा प्रश्न निर्माण होतो.

तालुक्यातील व बाहेरील बहुतांश ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची व नागरिकांची दर्यापूर बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र बसस्थानकात घाणीचे साम्राज्य असल्यामुळे प्रवाश्यांच्या आरोग्यस धोका संभावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आगारात शौचालय असूनही प्रवाशी आवारातच लघुशंकेला जातात. पिण्याच्या पाण्याची पूर्णता वाट लावून गेली असून त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी गेले असता नागरिक पाय घासरून खाली पडतात,नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहतात.
याचबरोबर प्रवाशांचे बसण्याच्या ठिकाणी गुटखा खाऊन जागा बेरंग झाली आहे. तसेच बस स्थानकाच्या आत मध्ये अनधिकृत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते,
प्रवासी बस थांबण्याच्या ठिकाणी गर्दी करत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. बसमध्ये देखिल प्रत्येक खिडकीजवळ किंवा मागच्या बाजूस मावा गुटखा थुंकलेला पहावयास मिळतो.या सर्व बाबींचा विचार करता प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करणे पसंत करत असल्यामुळे एसटी महामंडळास आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे वास्तव चित्र आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे,”बहुजन हिताय बहुजन सुखाय,हे ब्रीद वाक्य उलटे ठरते की काय अशी शंका निर्माण झाली आहे.
कोणत्याही प्रकारचे प्रवाशांचे हित व सुखकर प्रवास नागरिकांना मिळत नसल्याचे जाणवत आहे.शाळा,कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना तोंडाला रुमाल बांधून प्रवास करावा लागत आहे.तर आगारात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला तोंडाला रुमाल बांधूनच यावे लागत आहे.या सर्व बाबींकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
प्रतिक्रिया…..
दर्यापूर स्थानकाच्या दुरावस्थेला आगार व्यवस्थापक व एस. टी. महामंडळाचे प्रशासन जबाबदार आहे. शबस स्थानकाच्या आवारातील कचऱ्यात बॉटल,सडलेली फळे, प्लास्टिक पन्नी व विविध वस्तू आढळून येतात.याचा परिणाम प्रवाश्यांच्या आरोग्यवर होतो.
नितेश गावंडे
सामाजिक कार्यकर्ता..
प्रतिक्रिया….
नविन आगाराचे काम चालू असल्यामुळे पिण्याचे पाण्याची व्यवस्था ही तात्पुरत्या स्वरूपात केली आहे. वाहनाचे अतिक्रमण संदर्भात दर्यापूर पोलीस स्टेशनला पत्र व्यवहार केलेला आहे.



