उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक..
चिमूर तालुक्यातील मौजा मेटेपार येथे जिवंत विद्युतप्रवाहाच्या शार्क सर्किटमुळे शेतकरी रामदास नन्नावरे यांच्या धानाचे पुंजणे जळत असल्याची माहिती त्यांना मिळाली.
जळत असलेले धानाचे पुंजणे विझविण्यासाठी शेतकरी रामदास नन्नावरे हे आपल्या शेतात गेले असता,धानाचे पुंजणे विझविताना त्यांना सुध्दा जिवंत विद्युत प्रवाहाच्या शार्क सर्किटचा फटका बसला व ते सुद्धा जळाले आणि बेशुद्ध झाले.
२ एकर शेतातील धानाचे पुंजणे जिवंत विद्युत प्रवाहमुळे जळाल्यामुळे जवळपास १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.याचबरोबर धान पुंजण्याची आग विझवतांना शेतकरी रामदास नन्नावरे हे शार्क सर्किटमुळे जळले आहेत.
हि दुर्दैवी घटना २२ नोव्हेंबरला अंदाजे ३ वाजताच्या सुमारास घडली असून,शेतकरी रामदास नन्नावरे यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
जिवंत विद्युत प्रवाहाच्या शार्क सर्किटमुळे शेतकरी रामदास नन्नावरे व त्यांच्या धानाचे पुंजणे जळाल्याने चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा व चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी आर्थिक मदत करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
याचबरोबर धानाचे पुजणे शार्क सर्किटमुळे जळून खाक झाल्याने सदर धानाची नुकसान भरपाई सुध्दा विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने देण्यासाठी तत्परता दाखवली पाहिजे हा नियम सांगतो आहे.



