Home Social जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडवाडी येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना…. ...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडवाडी येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना…. — माजी विद्यार्थ्यांचा स्नेह बैठक मेळावा उत्साहात संपन्न!

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

          कन्नड तालुक्यातील मौजा मुंडवाडी येथील जि.प.उच्च प्रा.शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.

         मुख्याद्यापीका व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.गजानन बनसोड,उपाध्यक्ष,सचिव व सर्व शिक्षकवृंद जि.प.प्रा.शा. मुंडवाडी,ता.कन्नड,जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या सहविचाराने 15 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह बैठक मेळावा आयोजित करण्यात आला होता.

         या स्नेह बैठक मेळावा कार्यक्रमाला उच्च प्रा. शा.मुंडवाडी येथील विविध क्षेत्रातील प्रशासकीय,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,व्यावसायिक,उद्योजग,शेती,सहकार,तंत्रशिक्षण,उच्च शिक्षण,कला इत्यादी अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते.

         मुख्य म्हणजे या शाळेतील माजी विद्यार्थी जिल्हाधिकारी झालाय हे कौतुकास्पद बाब आहे.श्री.गोरख सातदिवे हे मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

      तद्वतच राज्यातील प्रसिद्ध तथा यशस्वी व्यावसायिक तेजराव बारगळ,काकासाहेब कवडे पाटील (मा. सरपंच मुंडवाडी) प्रमोद कवडे,नारायण बनसोड,गणेश बारगळ,अप्पासाहेब पवार,राजेश जाधव,सागर बनसोड,अमोल बनसोड,आबासाहेब तायडे,जयवंता मिसाळ,रमेश गवळी,कारभारी दांडगे,कडुबा पवार,मच्छिन्द्र गवारे,रमेश पवार,विजय आव्हाड,अप्पासाहेब सातदिवे,संदीप सोनवणे,योगेश बारगळ,रामेश्वर घनकर,भागीनाथ बारगळ,बापूसाहेब बारगळ,भगवान बारगळ,

रामेश्वर मोरे,कारभारी मिसाळ,बबनराव बनसोड,रमेश घनकर,गजानन बनसोड,गोकुळ सोनवणे ,गोविंद सोनवणे,बजरंग राजपूत,बाळू जाधव,कल्याण पवार,श्री.कैलास लाडके केंद्रप्रमुख हे उपस्थित होते.

           या मेळाव्यात शालेय विकासासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी गोरख सातदिवे यांनी 64 इंची स्मार्ट टिव्ही शाळेला भेट दिली.त्याच प्रमाणे तेजराव बारगळ यांनीही स्मार्ट टिव्ही शाळेला भेट दिली.

      याचबरोबर रामेश्वर मोरे यांनी वर्षभर रिचार्ज सह वायफाय कनेक्शन,प्रमोद कवडे रु.दहा हजार,तर कारभारी मिसाळ, रामेश्वर घनकर,माधवराव तायडे,भगवान बारगळ प्रत्येकी पाच हजार रुपये सहकार्य केले.

         तद्वतच भगवान बारगळ,बापूसाहेब बारगळ प्रत्येकी एक हजार रुपये देणार असे सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता बाविस्कर,गणेश सोनवणे,अनिल महाजन,राजश्री पाटील व बाजीराव राठोड यांनी परिश्रम घेतले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश सोनवणे सर तर आभार प्रदर्शन बाविस्कर मॅम यांनी व्यक्त केले.