प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या वतीने आयोजित 19 वर्षाखालील मुलींच्या हॉकी स्पर्धेत आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, आवारपूर चा संघाने विभागीय हॉकी स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात, आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल, आवारपूरच्या संघाने वर्धा जिल्ह्याचा पेनल्टी शूटआऊटमध्ये २-१ असा पराभव केला, तेजस्वी संपत येल्लावेणी आणि प्रियांशी येडे यांनी केलेल्या गोलच्या जोरावर हा संघ सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करेल.
या संघात प्रियांशी येडे (कर्णधार), हर्षाली गोंडे, श्रावणी खनके, हिमानी सूर, दिव्या धानोरकर, प्राची गोडे, अवनी कोतपल्लीवार, पूर्वी प्रमोद रिठे, वैष्णवी सुरनार, देवानंदना दिलीपकुमार, रिंकू रॉय, तेजस्वी संपत येल्लावेनी, बर्नाली खटुआ, प्रिमल पाइस आणि रिशा कुमार यांचा समावेश होता.
संघाचे प्रशिक्षक हॉकी इंडिया लेव्हल-२ प्रशिक्षक भूपेश काळे होते, तर व्यवस्थापक किरण टिमोथी होते. प्राचार्य संजीत सोनी यांनी खेळाडूंचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन केले.



