Home Breaking News ब्रेकिंग न्यूज… — गायीचा जिव घेतला वाघाने…. — मौजा मालेवाडा...

ब्रेकिंग न्यूज… — गायीचा जिव घेतला वाघाने…. — मौजा मालेवाडा येथील धक्कादायक घटना…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

        मौजा मालेवाडा येथील गायीवर हल्ला करून वाघाने जिव घेतला असल्याची धक्कादायक घटना आज घडली.सदर गायीचे मालक सुरेश चौधरी आहेत.

       चिमूर तालुकातंर्गत मौजा मालेवाडा आहे.या गावातील नरसळी मध्ये वाघाने हल्ला करून गायीला मारल्याची घटना घडली.

      यामुळे जांभुळघाट,कोटगाव,हेट्टी,बोडधा,शिवणपायली,नेरी,सावरगाव,खापरी (धर्मू),रामपूर परिसरात रक्तपिपासू दुसरा वाघ असल्याचे पुढे आले आहे.

        सदर वाघाने गुराखी व पाळीव प्राण्यांवर लक्ष केंद्रित केले असून हा वाघ मनुष्य मात्रांसाठी घातक असल्याचे दिसून येते आहे.

          या रक्तपिपासू वाघाचा सुध्दा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोहीम राबवायला पाहिजे असा नागरिकांचा मतप्रवाह आहे.