संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान मध्ये देवाकडे प्रार्थना केली की “खळांची व्यंकटी सांडो “. याचा अर्थ माणसातील वाकडेपणा नष्ट होवो. सरळ चालणे सरळ बोलणे सरळ विचार करणे सरळ कार्य करणे सरळ वागणे, सरळपणा म्हणतात. परंतु या जगात अशी कितीतरी माणसे आहेत की सतत वाकडे बोलतात वाकडे वागतात, वाकडे चालतात, आणि काहीही वाकडेच करतात. वाकडेपणा याचा अर्थ दुर्गुणी कृत्य, दृष्टकृती, इतरांना त्रास होईल असे कृत्य किंवा विचार. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी इतरांना त्रास देणे असे कृती म्हणजे वाकडेपणा होय. वाकड्या विचाराची स्वभावाची माणसे या जगात काही कमी नाहीत, आणि सरळ विचाराची आणि स्वभावाची माणसे मात्र या जगात भरपूर आहेत, पण ते मूग गिळून गप्प आहेत, वाकडी माणसे सक्रिय असतात, आणि सरळ माणसे निष्क्रिय असतात, कातडी बचाव चे काम करतात. म्हणूनच वाकड्या माणसांची चलती आहे.
संत ज्ञानेश्वरांनी ईश्वराकडे अशा वाकड्या माणसातील वाकडे पण दूर होवो अशी सदिच्छा केली नव्हे ईश्वराकडे याचना केली, परंतु बाकड्या माणसातील वाकडे पण करण्याची शक्ती किंवा युक्ती ईश्वरा ईश्वराकडे आहे काय ? असेल तर मग माणसे वाघ वाकडी वागलीच नसती, दुष्ट माणसातील दुष्टपणा किंवा वाकडेपणा घालवण्याची शक्ती किंवा युक्ती ईश्वराकडे नाही म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी प्रार्थना करून हजारो वर्षे झाली अजूनही तीच प्रार्थना पसायदान अजूनही आपणही म्हणत आहोत तरीपण वाकडेपणा काही जात नाही, वस्तुस्थिती किंवा सत्य आपण समजून घेणे आवश्यक आहे.
संत ज्ञानेश्वरांना वाटले किंवा त्यांचे मत असे होते की, माणूस हा ईश्वराचा पुत्र आहे, त्यानेच त्याला जन्म दिला आहे, त्यामुळे मुले जशी बापाचे ऐकतात तसे ही वाकडी माणसे बापाचे ऐकतील, नाही ऐकले तर बाप स्वतःचा अधिकार वापरेल, आणि वाकड्याला सरळ करेल, असे ज्ञानेश्वरांना कदाचित वाटले असावे, नव्हे यावर त्यांचा विश्वास होता, या विचारावर त्यांची निष्ठा होती, म्हणून माणसातील वाकडे पण नाहीसे करण्याचा स्वतः प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी ते ईश्वरावर सोडून दिले,”खलनिग्रहाय “हा त्यांचा भाव शुद्ध होता पण भाबडा होता, यावर त्यांचे चिंतन हे संशोधनात्मक नव्हते, तर विश्वासात्मक होते, त्यांनी देवावर विश्वास ठेवला की, देवच हे काम करू शकतो, परंतु हजारो लाखो वर्षाचा अनुभव लक्षात घेतला तर असे लक्षात येते की, खल व्यक्तीमधील खल पण जात नाही, उलट ते वाढतच असते. म्हणजे माणसातील दुर्गुण हे कमी होण्याऐवजी वाढतच असतात, असे का होते ? यावर चिंतन आणि संशोधन ज्ञानेश्वरांनी करायला पाहिजे होते, ते न करता फक्त देवावर भरोसा ठेवून बसले, दैवावर भरवसा ठेवून बसले, म्हणून त्यांच्या आई-वडिलांना धर्म मार्तंडाने प्रायश्चित म्हणून पाण्यात बुडून मारायला सांगितले, आणि त्यांनी तसे केले, तरी त्या धर्म मार्तंडांची ती चूक होती, असे ज्ञानेश्वरांना वाटले नाही किंवा लोकांना सांगितले नाही, किंवा त्यांचे विरुद्ध बंड करून उठले नाहीत, याचे कारण म्हणजे देवनिष्ठा आणि दैवनिष्ठा हे होय. अजूनही अनेक महाराज आपल्या कीर्तनातून देवनिष्ठा आणि धर्मनिष्ठा आणि दैवनिष्ठा जपली पाहिजे, असाच प्रचार आणि प्रसार करीत असतात, परिणामी खळांची वेंकटी काही सांडत नाही, जय सिद्धी परिस्थिती असते, नव्हे त्यात अजून वाढत होत असते. धर्मामध्ये खोटेपणा फसवेपणा अनागोंदी कारभार माजलेला आहे त्याचे कारण हेच आहे.
माणसातील माणसाचे वाकडे पण काही जात नाही, याचे अजून एक कारण आहे, ते म्हणजे “संस्कार “. कुटुंबात गल्लीत गावात समाजात देशात वातावरण जर गढूळ असेल, विषमतावादी विचाराचे असेल, समतेचा भाव, आणि समतेच्या प्रतिकृती काही समाजात नसतील तर याचा परिणाम माणसावर होतो, आणि मानसी बिघडतात. याचा अर्थ “भौतिक परिस्थिती “होय. मुलाच्या असो की तरुणांचा की रोड वा म्हाताऱ्यांच्या भोवतीचे वातावरण परिस्थिती जर दुर्गुणी असेल तर त्याचा परिणाम माणसावर होतो. म्हणतात ना, जशी दृष्टी तशी सृष्टी, तसेच जशी सृष्टी तशी दृष्टी, याचा अर्थ सृष्टीवरून दृष्टी ठरते, आणि दृष्टीवरून सृष्टी तयार होते, दृष्टी म्हणजे नजर नव्हे तर दृष्टी म्हणजे विचार, विचार हे सभभवतील वातावरणानुसार बनत असतात, भौतिक परिस्थिती जर विषमतावादी असेल, तर माणसाचे विचार पण विषमतावादीच बनतात, त्यात समता समानता स्वातंत्र्य बंधुभाव न्याय दया क्षमा शांती काही काहीच निर्माण होत नाही, आणि भौतिक परिस्थिती जर समता वादी असेल तर या साऱ्या गोष्टी माणसात आपोआप येतात, म्हणजेच समता दृष्टी सम्यक दृष्टी समतोल विचार माणसात निर्माण होतात आणि त्यानुसार समदृष्टी ने माणूस व्यवहार करायला लागतो, अर्थात हे सत्य ज्ञानेश्वर महाराजाला कळले नसावे, म्हणून ते भाबडेपणाने वेंकटीचे कारण देव आणि देव हे ठरविले , म्हणून देवाकडे पसायदान मागितले.
ज्ञानेश्वर हे संत होते, संत याचा अर्थ समतेचे विचार असलेले, शुद्ध, निष्पक्ष, आणि परोपकारी भावना असलेले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, या विचाराने चालणारे थोर मनाचे थोर विचाराचे, व्यापक विचाराचे होते, सद्भावना सदवर्तन सत्ककृत्य हे त्यांचे वैशिष्ट्य होते, तरीपण माणसातील वाकडेपणाचे कारण त्यांना समजले नव्हते, याचे कारण त्यांची वैचारिक बैठक. देवाने देवावरच्या भरवसा.
कार्यकारण भाव सिद्धांत नुसार जे काही घडते जी कृती घडते किंवा जे कार्य घडते, किंवा जे काय आहे, ते कारणाशिवाय काही घडत नाही आणि कारणाशिवाय काही असत नाही, हा विचार म्हणजेच कार्यकारण भाव सिद्धांत होय. खळांची म्हणजे दुष्ट माणसांची, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, सांडो म्हणजे नाहीसा होवो. अशी सदिच्छा व्यक्त केल्याने, किंवा ईश्वराकडे याचना केल्याने माणसातील दुर्गुण नष्ट होत नसतात, त्यासाठी प्रबोधनाबरोबर व्यवस्था परिवर्तन होण्याची पण गरज असते. विषमतेचे विचार सोडून समतेचे विचार लोकांनी धारणा करणे आवश्यक आहे, तशी संस्कार होणे आवश्यक आहे, आणि असे होण्यासाठी माणसाभोवतीची परिस्थिती व्यवस्था वातावरण हे समतेचे पाहिजे. हे संतांच्या कधी लक्षातच आले नाही.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड
दिनांक: 15 नोव्हेंबर 2025. फोन: 9420912209.


