Home Maharashtra पंढरपूर अधिवेशनाला आरमोरी येथील पत्रकार रवाना… 

पंढरपूर अधिवेशनाला आरमोरी येथील पत्रकार रवाना… 

ऋषी सहारे

   संपादक 

आरमोरी :- ‘व्हाईस ऑफ मीडिया’ (Voice of Media) आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य शिखर अधिवेशनाच्या (State Summit Convention) येथे गडचिरोली जिल्हातील शेकडो पत्रकार अधिवेशनाला जात असून त्याची सुरुवात देसाईगंज (वडसा) येथून करण्यात आली.

        अधिवेशनाला जाणाऱ्या गाडीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ.कृष्णा गजबे, DPDC सदस्य तथा उद्योग आघाडी जिल्हाअध्यक्ष आकाश अग्रवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी देऊन रवाना करण्यात आली.

        त्याच बरोबर आरमोरी येथील पत्रकार त्याच ट्रॅव्हल ने रवाना झाले.त्यात व्हाइस ऑफ मिडिया तालुका अध्यक्ष ऋषी सहारे, उपाध्यक्ष सुरेंद्र बावनकर, सचिव राजेंद्र मोटघरे, प्रसिद्धी प्रमुख सुरेश कांबळे, सल्लागार भिमराव ढवळे, रोशनी बैस जी. स. होते.