Home Vidarbha राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका सावलीचे कार्यकारणी गटीत… — तालुका अध्यक्ष...

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका सावलीचे कार्यकारणी गटीत… — तालुका अध्यक्ष पदी प्रमोद डोहणे तर उपाध्यक्ष पदी राजेंद्र गडडमवार…

    सुधाकर दुधे 

सावली तालुका प्रतिनिधी 

सावली :- राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ (भारत)जिल्हा चंद्रपुर वतीने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका सावलीचे कार्यकारणी गठीत करण्यात आली.यात चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय संघटक निलेश ठाकरे,प्रणित भगत,सचिन सातपुते, वाहणे सर यांच्या उपस्थित आज दिनांक 07/11/2025 रोज शुक्रवारला बैठकीचे आयोजन करण्यात आले तसेच तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

          राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका अध्यक्षपदी प्रमोद डोहणे तर उपाध्यक्ष पदी राजेंद्र गडडमवार यांची निवड झाली.सचिव पदी राहूल उंदिरवाडे,सहसचिव पदी नितीन कस्तुरे, सल्लागारपदी सुरेश सोमकुवर, संघटक प्रमुखपदी गिरजाशंकर दुधे, कोषाध्यक्षपदी राजुभाऊ राऊत,उपाकोषाध्यक्ष राजूभाऊ सोनुले यांची नियुक्ती करण्यात आली. तर सदस्य म्हणून भास्कर मेश्राम,कैलास बारसागडे,जितेंद्र उदिरवाडे,परेश तावाडे ,उल्लास डोंगरे यांची निवड करण्यात आली.

        कार्यक्रमाचे प्रस्ताविक शंकर दुधे,संचालण राहुल उंदीरवाडे तर आभार राजू राऊत यांनी मानले.