Home Maharashtra आधारभूत धान नोंदणी तात्काळ सुरू करण्याबाबत तहसीलदार चिमूर यांना उपसरपंच अशोक चौधरी...

आधारभूत धान नोंदणी तात्काळ सुरू करण्याबाबत तहसीलदार चिमूर यांना उपसरपंच अशोक चौधरी यांनी दिले निवेदन.

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

         दरवर्षी प्रमाणे चालू हंगामात शेतकऱ्यांकडून धान खरेदीसाठी शासनाच्या आधारभूत केंद्रांवर धान नोंदणी प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती.परंतु यंदा अद्यापपर्यंत संबंधित पोर्टलवर किवा केंद्रांवर धान नोंदणीची प्रक्रिया सुरू झालेली नाही.यामुळे आधारभूत धान नोंदणी तात्काळ सुरू करावे अशी मागणी उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार चिमूर यांच्याकडे केली आहे.

      या विलंबामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान साठवून ठेवलेले असून त्यात ओलसरपणा,कुजणे,उंदीर व पक्ष्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. 

         दुसरीकडे बाजारात व्यापाऱ्यांकडून कमी दरात खरेदी सुरू असल्याने शेतकरी हतबल होत आहेत.

धान नोंदणी उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य भाव मिळत नाही,शेतमाल साठवण्याच्या अडचणींमुळे नुकसान होते,शासनाच्या हमीभाव योजनेचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही असे उपसरपंच अशोक चौधरी यांचे म्हणणे आहे.

ठाम मागणी…..

1. संबंधित विभागाने तातडीने धान नोंदणी प्रक्रिया सुरू करावी.

2. नोंदणी केंद्रांची संख्या वाढवून शेतकऱ्यांना सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.

3. विलंबामुळे झालेल्या नुकसानीची नोंद घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करावी.

     चिमूर तहसिलदार श्रिधर राजमाने हे शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील होत शेतकऱ्यांच्या मागणीचा तातडीने विचार करून योग्य तो निर्णय घेतील अशी खात्री उपसरपंच अशोक चौधरी यांना आहे.

          निवेदनाची प्रती जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आली आहे.