Home Maharashtra मनरेगा अंतर्गत मजूरांचे रुपये द्या:- उपसरपंच अशोक चौधरी…  — गट विकास...

मनरेगा अंतर्गत मजूरांचे रुपये द्या:- उपसरपंच अशोक चौधरी…  — गट विकास अधिकारी चिमूर यांना निवेदन…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी 

          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणाऱ्या चिमूर तालुक्यातील मजुरांना गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मजुरी मिळाली नाही.मजूरीपासून वंचित असलेल्या मजूरांना अनेक अळचणीचा सामना करावा लागतो आहे.

           यामुळे परेशान व त्रस्त असलेल्या मजूरांना त्यांच्या कामाचे दाम लवकरात लवकर देण्यात यावे,याकरीता शंकरपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी चिमूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

         त्यांनी निवेदनात म्हटले आहे की मौजा चिमूर तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध विकासकामे (उदा. रस्ता दुरुस्ती,नाला खोलकरणे,झाडे लावणे,चर खणणे,गाळ काढणे,मातीकाम,घरकुलचे मस्टर इ.) करण्यात आली होती.

         या सर्व कामांमध्ये स्थानिक मजुरांनी प्रामाणिकपणे काम केले असून,त्यांना आता पाच ते सहा महिन्यांपासून मजुरीचे मानधन मिळालेले नाही.

         त्यामुळे मजुरांवर आर्थिक संकट ओढवले आहे.अनेकांच्या घरी दैनंदिन खर्च,मुलांचे शिक्षण,वैद्यकीय गरजा भागविणे कठीण झाले आहे. 

         शासनाच्या रोजगार हमी योजनेचा उद्देश मजुरांना आर्थिक सुरक्षितता देणे हा असून प्रत्त्यक्षात त्यांना मजुरी न मिळाल्यामुळे या योजनेचा हेतूच अपूर्ण राहिला आहे.

मागणी….

1. संबंधित कामांच्या बिलांची तपासणी करून मजुरांची थकीत मजुरी तात्काळ मंजूर करावी.

2. भविष्यात मजुरी थकू नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून जबाबदार विभागाला निर्देश द्यावेत.

         निवेदनात गटविकास अधिकारी हे मजूरांच्या मजूरी देणेबाबत तात्काळ कार्यवाही करतील अशी अपेक्षा उपसरपंच अशोक चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

           निवेदनाच्या प्रति सादर चंद्रपूर जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत….