पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- ‘व्हाईस ऑफ मीडिया’ (Voice of Media) आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य शिखर अधिवेशनाच्या (State Summit Convention) येथे गडचिरोली जिल्हातील शेकडो पत्रकार अधिवेशनाला जात असून त्याची सुरुवात देसाईगंज (वडसा) येथून करण्यात आली. अधिवेशनाला जाणाऱ्या गाडीला आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. कृष्णा गजबे, DPDC सदस्य तथा उद्योग आघाडी जिल्हाअध्यक्ष आकाश अग्रवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी देऊन रवाना करण्यात आली.
यावेळी नरेश विट्ठलानी, राजू आकरे, जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक शामराव बारई गुरुजी, व्हाॅईस ऑफ मिडीया गडचिरोली जिल्ह्याचे महासचिव विलास ढोरे, जिल्हा साप्ताहिक विंग चे संघटक प्रकाशचंद्र दुबे, सदस्य पुरुषोत्तम भागडकर, पंकज चहांदे, रवींद्र कुथे, कुरखेडा धानोरा येथिल पत्रकार उपस्थित होते.



