ऋषी सहारे
संपादक
कोरची :- तालुक्यात हितापाडी,बोरी,कोसमी नं.2, हुराटोला, कोटगुल, अलोंडी,येथे गोतस्कराचे अड्डे आहे त्या ठिकाणी 300ते 400 गाय, बैल, रेडे, म्हैस या ठिकाणाहुंन दरोज दोन ते तिन गाडी रात्रो नागपुर, हैदराबाद येथे पाच ते सहा पोलिस स्टेशन पार करुन कत्तलखाना पाठवले जाते.
पोलीस अधिक्षक यांनी कोरची तालुक्यात लक्ष घालून गोतस्कर तात्काळ बंद करण्यात यावी.
चंद्रपूर रोडवरील कनेरी नाका मार्गाने कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या कसायाच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या गोरक्षकांवर लोखंडी राॅडने बंदुकीच्या सहाय्याने हल्ला झाल्यांची घटना 8 नोव्हेंबर रोजी पहाटे सुमारास चंद्रपुर कनेरी नाका मार्गावर घडली.
त्यामध्ये तीन गोरक्षक जखमी झाले.गोरक्षक जखमी करणाऱ्या कसायावर तात्काळ अटक करून कार्यवाही करण्यात यावी व गो तस्करी तात्काळ थांबविण्यात यावी.
तसेच कोरची तालुक्यात सुध्दा अनेक कसायाचे अड्डे आहेत ते कार्यवाही करून तात्काळ थांबविण्यात यावी .न थांबविल्यास शिवसेना (शिंदे गट)तालुका शाखा कोरची तर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक मुंबई, पोलिस अधीक्षक गडचिरोली, पोलीस स्टेशन कोरची, सुरेंद्र चंदेल लोकसभा संघटक यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
नायब तहसिलदार यांना निवेदन सादर करण्यात आले त्यावेळी माजी शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.नरेश देशमुख कोरची, कृष्णाजी कावळे तालुका प्रमुख संघटक कोरची, राजुभाऊ गुरूनुले, तालुका उपसंघटक, एस.जी. निबेंकर ता कार्यकर्ते कोरची, ई.आय.सैय्यद कोरची यांनी दिले आहे.



