Home Maharashtra श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सुरेश वडगांवकर… — उपाध्यक्ष...

श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सुरेश वडगांवकर… — उपाध्यक्ष पदी पांडुरंग कुऱ्हाडे व सचिव पदी अजित वडगांवकर…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी – येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश वडगांवकर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी ही माहिती दिली. वडगांवकर हे गेली तब्बल ४८ वर्षे संस्थेचे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.

         सुरेश वडगांवकर हे आळंदी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आहेत. तसेच श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघाचे ते गेली २६ वर्षे अध्यक्ष आहेत. समाजकारण, शिक्षण आणि धार्मिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा लौकिक आळंदी परिसरात आहे.

         ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेत सर्व विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत पदाधिकारींची निवड करण्यात आली. त्यानुसार…

अध्यक्ष : सुरेश धनराज वडगांवकर

उपाध्यक्ष : पांडुरंग चंद्रकांत कुऱ्हाडे

सचिव : अजित सुरेश वडगांवकर

खजिनदार : डॉ.ज्ञानेश्वर श्रीधर पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

         या प्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर म्हणाले, “संस्था नेहमीच सर्वांना विश्वासात घेऊन कार्य करते. गेल्या अनेक वर्षांत संस्थेने सातत्याने प्रगती साधली आहे. सभासदांनी दाखवलेला विश्वास आणि साथ हीच आमची ताकद आहे.

         यापुढेही सर्वांच्या सहभागातून संस्थेचा उत्तरोत्तर विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे ते म्हणाले. संस्थेच्या फेरनिवडीबद्दल सुरेश वडगांवकर आणि त्यांच्या सहकार्यांचे शहरातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.