Home Maharashtra पिंपरी बुद्रुक ते गिरवी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक व ऊस वाहतूक ड्रायव्हर...

पिंपरी बुद्रुक ते गिरवी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक व ऊस वाहतूक ड्रायव्हर त्रस्त…..

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी… 

        पिंपरी बुद्रुक ते गिरवी गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून,संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. 

        या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत असून,रोज अपघाताचा धोका वाढला आहे.

         प्रशासनाकडून मात्र अद्यापही कोणतीच ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

         सदर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी,चारचाकी तसेच स्कूल बस व एसटी बस,ऊस वाहतूकदार,चालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

      पावसाळ्यानंतर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक जण किरकोळ अपघातात जखमी झाले आहेत.स्थानिक शेतकऱ्यांना शेतीमाल ने-आण करण्यासाठीही मोठा वेळ व खर्च वाढला आहे.

        स्थानिक नागरिक “हा रस्ता म्हणजे खड्ड्यांचे साम्राज्य बनला आहे,प्रशासन वाट पाहतेय कुणाचा जीव जाण्यासाठी?” असा संतप्त सवाल उपस्थित ग्रामस्थ करीत आहेत .

        या संदर्भात गावकऱ्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की या भागात ऊस उत्पादक हजारो शेतकरी असल्यामुळे ऊसाची वाहतूक करताना ड्रायव्हरला खड्ड्यांमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

          स्वतःचा जीव मोठी ठेवून ऊस वाहतूक करावी लागत आहे.पिंपरी ते गिरवी परिसरातील रस्त्यावरील संपूर्ण खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अशी या भागातील ऊस वाहतूक दार व शेतकरी आणि ग्रामस्थ करीत आहेत.

         रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लवकरात लवकर निधी मंजूर करून कायमस्वरूपी काम हाती घ्यावे,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.

       मुख्य मागण्या :तातडीने खड्डे बुजवून घ्यावेत,रस्त्यावर कायमस्वरूपी खड्ड्यावर डांबरीकरण करावे,अपघात रोखण्यासाठी सूचना फलक व सुरक्षा उपाययोजना कराव्यात..

       आता प्रशासन या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन ठोस निर्णय घेणार का? याकडे पिंपरी बुद्रुक व गिरवी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.