Home उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतावर सोलर पंप देण्याची मोहीम त्वरित राबवावी.:- उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी…...

शेतकऱ्यांच्या शेतावर सोलर पंप देण्याची मोहीम त्वरित राबवावी.:- उपसरपंच अशोक ज्ञानेश्वर चौधरी… — शेतकऱ्यांच्या अर्जांना किंमत आहे की नाही,अधीक्षक अभियंता/कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.चंद्रपूर यांना उपसरपंच अशोक चौधरी यांचा प्रश्न…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

        “मागेल त्याला सोलर योजना” राबविण्यात आलेल्या उपक्रमाला अनुसरून तातडीने शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसविण्यासंबंधाने काम सुरू करण्याबाबतचे निवेदन उपसरपंच अशोक चौधरी यांनी अधिक्षक अभियंता व कार्यकारी अधिकारी विद्युत विज वितरण कंपनी लि.चंद्रपूर यांना दिले आहे.

         निवेदनात म्हटले आहे की,सविनय नव्हे तर तीव्र निषेधासह निवेदन करीत आहे की. “मागेल त्याला सोलर योजना” या शेतकरीहित योजनेचा उद्देश अत्यंत चांगला असूनसुद्धा, प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी अत्यंत ढिसाळ,निष्क्रिय आणि शेतकऱ्यांना त्रासदायक पद्धतीने केली जात आहे.

         शेतकऱ्यांनी मागील आठ ते दहा महिन्यांपूर्वीच ऑनलाईन अर्ज सादर करून,आवश्यक कागदपत्रे अपलोड करून,शासननिर्धारित रक्कम भरून पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे.संबंधित कंपनीचे नाव निवडून सबमिटही करण्यात आले आहे.तरीदेखील आजपर्यंत एकाही शेतकऱ्याच्या शेतीवर सोलर पंप बसविण्याचे काम सुरू झालेले नाही.

       इतक्या कालावधीनंतरही कामाची सुरुवात न होणे हे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या बेफिकीर व निष्क्रिय प्रशासनाचे निदर्शक आहे.

         शेतकरी दिवसरात्र विजेअभावी त्रस्त आहेत.सिंचनाच्या अडचणींमुळे पीक वाया जात आहे,आणि शासनाच्या सोलर योजनेचा लाभ मिळेल या आशेवर शेतकरी आजही वाट बघत आहेत.हे चित्र शेतकऱ्यांप्रती अन्यायकारक आणि अमानुष आहे.

        शासनाची योजना कागदावर सुरू आहे.पण जमिनीवर पूर्ण ठप्प स्थितीत आहे.संबंधित विभागाने जबाबदारी टाळण्याची वृत्ती सोडून तातडीने शेतकऱ्यांचे सोलर पंप बसविण्याचे काम सुरू करावे,अन्यथा शेतकऱ्यांकडून तीव्र आंदोलनात्मक पाऊल उचलण्यास भाग पडेल,याची नोंद घ्यावी अशा इशारा उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

म्हणूनच आम्ही ठाम मागणी करीत आहोत की…. 

         1. “मागेल त्याला सोलर योजना” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची कामे तातडीने सुरू करून पूर्ण करण्यात यावीत.

        2. झालेल्या विलंबासाठी जबाबदार अधिकारी व कंपनी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.

3. कामासंबंधी संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात त्वरित उपलब्ध करून द्यावी.

               उपसरपंच अशोक चौधरी यांनी म्हटले आहे की,शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे.शासनाच्या योजनेचा लाभ वेळेत न मिळाल्यास शेतकरी बांधवांना कठोर आंदोलनात्मक निर्णय घ्यावा लागेल,याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील.

      निवेदनाच्या प्रती ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,ना.अशोक उईके,मंत्री आदिवासी विकास विभाग तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा.जिल्हाधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांना देण्यात आल्या आहेत.