या देशात जो कुणी RSS, मोहन भागवत,मोदी, शहा,भाजप अर्थात संविधानविरोधी शक्तीच्या विरोधात संविधानाच्या जागृतीच्या माध्यमातून महापुरुष, महामाता, तत्ववेत्ते यांच्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार, मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून, व्हाट्सअप, फेसबुक, यु ट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम इ. समाजमाध्यमावर बोटावर मोजण्यातके देशात जागृतीचे कार्य प्रसंगी निर्भीडपणे रस्त्यावर उतरून व्यवस्थेशी दोन हात करतात.अशा जागृतीचे कार्य करणाऱ्यांच्या विरोधात येथील नपुंसक,षंढ आणि नेभळट RSS वादी व्यवस्था जी कधीही वैचारिक वादविवाद करण्यासाठी शेपूट घालते आणि समोरच्यांच्या विरोधाच्या धारेला संपवण्यासाठी विरोधकांनाच व्यक्ती आणि व्यक्ती समूहांनाच संपवते.
उदा.:- श.डॉ.नरेंद्र दाभोळकर,श.गोविंद पानसरे,श.कलबुर्गी आणि श.गौरी लंकेश इत्यादिंना शरीराने संपवते.परंतू तेवढ्याच ताकदीने पुढची पिढी पुन्हा ज्वलंत कित्येक पटीने निर्माण होते. जसा रबरी चेंडू जेवढ्या ताकदीने दगडावर फेकाल त्याच्या डबल ताकदीने आपल्या दिशेने येतो. अगदी त्याप्रमाणे हा जसा नैसर्गिक नियम आहे. तसाच हा सामाजिक संक्रमनाचा नियम आहे.
म्हणून माझ्यासारखे जे जे या पातळीवर येऊन देशहितासाठी या संविधानविरोधी शक्तीच्या विरोधात तन,मन आणि धनाने जीवाची पर्वा न करता कार्य करतात. अशांच्या विरोधात ही RSS ची व्यवस्था व्यवस्थितपणे वेगवेगळ्या स्तरावर आणि प्रकारे मागे लागत असते!
म्हणून माझ्याही मागे हात धुऊन लागली आहे.मी ज्या पद्धत्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान जागृतीचे कार्य गेल्या पहिल्या लॉकडॉऊनपासून समाजमाध्यमावर करतो ( हलाखी या कार्याची सुरुवात 1991 पासून करतो. परंतु तुमच्यापर्यंत पोहोचण्याची अडीच महीन्याची संधी पहिल्या लॉकडाऊनने मिळवून दिली ).
मध्यंतरीच्या काळात म्हणजे 2022 मध्ये मी संपूर्ण महाराष्ट्रात ( 40 दिवस 36 जिल्हे )…
संविधान जनजागृण रॅली काढून,रस्त्यावर उतरून संविधानातील धूळ खात पडलेल्या कोहिनुर हिऱ्यांना जनतेच्या हृदयापर्यंत घेऊन जाण्याचे काम केले.
त्यानंतर EVM हटाव संविधान बचाव या प्रमुख मागणीसाठी मुख्यनिवडणूक आयोगाच्या विरोधात औरंगाबाद येथे विभागीय आयुक्तालयासमोर 21 दिवस आमरण उपोषण केले.
म्हणून व्यवस्थेने 4 महिन्यासाठी माझे व्हाट्सअप बंद करून टाकले.
त्यानंतर मी पुन्हा EVM हटाव संविधान बचाव म्हणून 36 जिल्हे आणि 40 दिवसाची महाराष्ट्रभर रॅली काढून संविधान आणि मूलभूत हक्कासाठी म्हणजे EVM कडून होणाऱ्या मताच्या चोरीच्या विरोधात देशभर जागृती केली.
गेल्या सहा वर्षात RSS ने अनेक स्पीडब्रेकर निर्माण केले. पण तरी सुद्धा गेल्या सहा वर्षात अनेक चढउतार बघितल्यामुळे आत्मविश्वास वाढत जाऊन खडकाप्रमाणे मजबुती आली. म्हणून की काय पुन्हा एकदा ही व्यवस्था माझ्यामागे लागलेली आहे…
म्हणूनच की काय….
माझे फेसबुक बंद केले ( कधी चालू होईल सांगता येत नाही )!
माझे व्हाट्सअपमधील ब्रॉडकास्ट ग्रुपवर ( ज्यात 255 × 17 = 4300) लोकांना एकाच वेळी संविधान जागृतीच्या पोस्ट,व्हिडीओ,फोटो वयक्तिकरित्या पाठवत असतो.त्यावर सुद्धा बंदी आणलेली आहे!
आता माझ्याकडे केवळ व्हाट्सअप ग्रुप आणि युट्युब ही दोनच समाजमाध्यमे राहिलेली आहेत.
तेंव्हा आपल्या सर्वांना एकच विनंती आहे.कोणत्याही व्हाट्सअपग्रुपवर माझ्या संविधान जागृतीचे पोस्ट, व्हिडीओ,फोटो आपण सर्वांनी जास्तीत जास्त व्हायरल कराव्यात……
कारण……
” जागृतीचा अग्नी नेहमी भडकवत ठेवला पाहिजे.:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर..
म्हणूनच ही विनंती आपल्या प्रत्येक ग्रुपमधील प्रत्येकाला आहे.



