Home Political माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या भूमिकेवर ठरणार आळंदीचा सत्तासंग्राम…

माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांच्या भूमिकेवर ठरणार आळंदीचा सत्तासंग्राम…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीची धामधूम सुरू असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रत्येक पक्ष, पॅनेल आणि स्वतंत्र उमेदवार आपापल्या ताकदीची जंत्री मांडत असताना आळंदीचे माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सर्व पक्षीय नेत्यांशी असलेल्या सुसंवादामुळे आळंदीतील राजकारणाचा तोल कोणत्या दिशेने झुकणार हे त्यांच्याच निर्णयावर अवलंबून राहणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

         बबनराव कुऱ्हाडे यांनी आळंदीचे नगराध्यक्ष म्हणून काम करताना आळंदीच्या विकासाचा पाया घातला. त्यांच्या काळात विविध विकास कामे मार्गी लागले आहे. त्यामुळे शहरात त्यांचा प्रभाव आणि विश्वास अजूनही कायम आहे.

          आगामी निवडणुकीत माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे कोणत्या बाजूने भूमिका घेणार, हे सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे काही प्रभागांतील समीकरणेच बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राजकारणातील अनुभवी नेते म्हणून ओळख असलेले बबनराव कुऱ्हाडे हे सर्व पक्षातील कार्यकर्त्यांशी सुसंवाद राखणारे नेते आहेत.

         जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका आणि विकासाभिमुख दृष्टीकोन त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. सध्या सर्वच पक्ष त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे बबनराव कुऱ्हाडे यांनी घेतलेला निर्णय आळंदी नगरपरिषदेच्या सत्तेसाठीचा तोल कोणत्या दिशेने झुकवतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राजकीय वर्तुळातील जाणकारांचे म्हणणे आहे की, “बबनराव कुऱ्हाडे यांची एकच घोषणा आळंदीतील अनेक उमेदवारांचे भविष्य ठरवू शकते.” येत्या काही दिवसांत त्यांची भूमिका जाहीर होणार असून, त्यानंतरच आळंदी नगरपरिषदेतील खरा राजकीय रंग उलगडणार आहे.