दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
गडचिरोली :- वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष हंसराज बडोले अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली असून आनंदराज आंबेडकर प्रणित रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला आहे. हंसराज बडोले यांची रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी बडोले यांची नियुक्ती एका पत्राद्वारे जाहीर केली आहे. रविवारी येथील विश्राम गृहात झालेल्या कार्यकर्ता बैठकीत रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते श्रीपति ढोले यांच्या हस्ते हंसराज बडोले यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच यावेळी पक्षाचे अन्य पदाधिकाऱ्यांची सुद्धा निवड करण्यात आली त्यात राजेंद्र बांबोळे- जिल्हा कार्याध्यक्ष, दुर्योधन तरारे-जिल्हा महासचिव, संध्या शेळके- महिला जिल्हाध्यक्षा, रविंद्र गायकवाड, सुखदेव गुलाबी, संजय डोंगरे, सुरेश राव, सुमेध शेळके, मीना शेळके, इंदुबाई कांबळे, रीना राव, सारा शेळके यांची निवड कार्यकारिणी सदस्य म्हणून जाहीर करण्यात अली. सर्वांचे गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हंसराज बडोले हे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष असताना संपूर्ण जिल्यात पक्ष संगठन मजबूत केले होते. नगर परिषदे पासून तर लोक सभे पर्यंतच्या निवडणुकांमध्ये त्यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे ते फुले शाहू आंबेडकरी विचाराचे कट्टर कार्यकर्ते असून उत्तम वक्ते व कुशल संगठन सुद्धा आहेत. संपूर्ण गडचिरोली जिल्यात त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे.
हंसराज बडोले यांच्या या कार्याची दाखल घेऊन आनंदराज आंबेडकर यांनी त्यांचेकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी सोपवलेली आहे. या नियुक्ती बद्दल बडोले यांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर, ज्येष्ठ नेते श्रीपती ढोले, विदर्भ अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांचे आभार मानले असून गडचिरोली जिल्यात पक्ष बळकट करण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करू याची ग्वाही दिली आहे . या नियुक्ती बद्दल अनेक मान्यवरांनी बडोले यांचे अभिनंदन केले आहे



