Home क्रीडा राजोली येथे भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धा चे आयोजन… 

राजोली येथे भव्य रात्रकालीन कबड्डी स्पर्धा चे आयोजन… 

भाविकदास करमनकर

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

       श्री साई क्रीडा मंडळ, राजोली यांच्या वतीने राजोली येथे भव्य रात्रकालीन खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

        याप्रसंगी स्पर्धेच्या अंतिम दिवशी उपस्थित राहून खेळाडूचा आनंद द्विगुणित केला व नागरिकांशी संवादही साधला.

        याप्रसंगी आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती वाढविण्यासाठी मंडळाचे योगदान उल्लेखनीय आहे. अशा उपक्रमांमुळे नव्या पिढीत क्रीडाविषयक जाणीव आणि आरोग्यदायी स्पर्धेची भावना निर्माण होते. असे मत व्यक्त केले.

        याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष साजन गुंडावार, जिल्हा उपाध्यक्ष श अनिल पोहनकर, जिल्हा सचिव सारंग साळवे, माजी जि.प. सदस्य सिन्नुजी दुल्लमवार, माजी पं.स. सदस्य रामरतनजी गोहणे, सरपंच तुळशीदास गेडाम, उपसरपंच अनिल शेंद्रे ता. महामंत्री सुभाष धाईत, व ग्रामस्थ उपस्थित होते.