पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :- तालुक्यात मागील तीन दिवसांपासून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याने विशेषतः धान कापणी हंगामात आलेल्या या अनिश्चित पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेले आहेत.
देसाईगंज तालुक्यात बहुतांश शेतामध्ये धान प्रमुख पिके शेवटच्या टप्प्यात आली आहेत कापणीच्या उंबरठ्यावर असलेल्या धान पिकावर सततच्या पावसामुळे पाण्याचा मारा झाल्याने धानाच्या कळपा भिजून अंकुर फुटत आहेत, शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेली आहे, शेतात साचलेला पाण्यामुळे काही ठिकाणी पिके आडवी झाली आहे, हलके धान कापणी आणि वेचणीच्या वेळीच पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने त्वरित झालेल्या नुकसानीचा पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी, अशा आशयाचे निवेदन देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले यांनी तहसीलदारांना दिले आहे.



