Home देशविदेश आमचा RSS ला विरोध का?कारण…..

आमचा RSS ला विरोध का?कारण…..

        RSS ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान मान्य नाही,RSS ला तिरंगा राष्ट्रध्वज मान्य नाही…

        RSS चे ध्येय म्हणजे हिटलरचे ध्येय.त्या हिटलरला संपूर्ण जगाला गुलाम बनवून स्वतःचेच राज्य सर्व जगावर लादायचे होते.

         RSS ला तथागत भगवान बुद्ध,म.फुले,सावित्रीमाई फुले,छ.शिवाजी महाराज,छ.शाहू महाराज,संत कबीर,संपूर्ण वारकरी संप्रदाय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,सर्व समाजसुधारक, सर्व क्रांतिकारक मान्य नाहीत,एवढेच काय RSS ला,भारताचे स्वातंत्र्य सुद्धा मान्य नाही!

      RSS ला केवळ 1818 ला संपलेली पेशवाईच मान्य नाहीत.

         RSS ला बहुजन ओबीसी समाजाची भीती अजिबात वाटत नाही.त्यांना मराठा समाजाची भीती वाटत नाही.त्यांना एस. सी.प्रवर्गातील 59 जातीपैकी 58 जातीची सुद्धा भीती वाटत नाही.कारण त्यांना आत्मविश्वास आहे की या जातीतील लोकांना आम्ही चुटकीसरशी अंधश्रद्धा आणि कर्मकांडात अडकवून सहज लुटू शकतो.देव आणि यांच्यातील आम्ही पडदा बनून कायम यांना गुलाम बनवून कुसांस्कृतिक मानसिक गुलाम बनवू शकतो. RSS यांची भीती किंवा चिंता अजिबात नाही!

        RSS ला भीती केवळ आक्रमक आंबेडकरवादी अर्थात जे कट्टर संविधानवादी आहेत अशाच लोकांची भीती आहे.जे भगवान बुद्धाच्या धम्माला आचरणातून सिद्ध ( देखावा न करता ) करतात.आणि अल्पसंख्यांक असलेल्या मुस्लिम बांधवांचीच या RSS ला भीती वाटते.

          RSS ला देशातील कोणतेही मानवतावादी महापुरुष मान्य नाहीत.यांना केवळ गोळवलकर गुरुजी आणि हेडगेवार यांचेच कुवैचारिक नेतृत्व मान्य आहे.जे जगाला गुलाम बनवू इच्छितात.त्यासाठी ते हिटलरप्रमाणे जगाला संपवण्याची सुद्धा RSS ची तयारी असते.

          RSS ला लोकशाहीच्या नावावर निर्माण झालेल्या संविधानिक संस्थांवर वरच्या दर्जाच्या प्रशासकीय आणि न्यायदानात वरच्या ठिकाणी अर्थात IPS , IAS, IRS, IFS, तसेच ज्यूडीशियरी उच्च न्यायालये,सर्वोच्च न्यायालये या मानाच्या आणि मोक्याच्या जागी बहुसंख्यांकाने ( तिथेही अल्पसंख्यांक नव्हे बहुसंख्यांकाने ) आपल्याकडेच राखीव पाहिजे यासाठी RSS अग्रणीच असते.कारण तिथेही अल्पसंख्यांकांना आपले गुलाम बनवण्यासाठी आपले डोईजड होऊ न देण्यासाठीच अग्रणी कार्यरत असते.

         देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीचे 1857 चे भट पांड्याचे बंड आणि स्वातंत्र्यानंतरचे आजपर्यंत म्हणजे आक्टोबर 2025 पर्यंतचे देशात वाहिलेले सर्व रक्तरंजित पाट,याला केवळ आणि केवळ प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे RSS हीच नोंदणी नसलेली संघटना कारणीभूत आहे (जरी प्रत्यक्ष गुन्हेगार ज्यांची नावे पोलिसांच्या रेकॉर्डवर बहुजन ओबीसी,मराठा,दलित मुस्लिम,इतर अल्पसंख्यांक असले तरी )!

         गेल्या साढेचार हजार वर्षांपूर्वी परकीय म्हणून आमच्या भारतात येऊन आम्हालाच मानसिक,कुसांस्कृतिक गुलाम करणारे,आमच्याच बांधवांना आमच्याच विरोधात उभे करून, काट्याने काटा काढणारी ही ब्राम्हण्यवृत्ती ही RSS ची आहे!

       म्हणून आमचा सर्व मुळ सिंधू संस्कृतीच्या भारतीय वंशाच्या आणि आत्ताच्या भारताच्या संविधानाने निश्चित केलेल्या संविधाननिष्ठ भारतीय जबाबदार सर्व नागरिकांचा या….

     RSS ला ( मनुवाद्यांना ),आम्ही भारताचे लोक म्हणून आमचा कायम विरोध होता,कायम विरोध आहे,कायम विरोध राहिल!

   जागृतीचा कृतिशील लेखक

            अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689…